सांगवी माेहाडी येथील ग्रामसेवक बाबाराव लक्ष्मणराव अरखराव यांनी आकाेट फैल पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सांगवी माेहाडी शेतशिवारात विजेच्या कामासाठी आणलेले लाेखंडी खांब, वीजतार व करवट अज्ञात चाेरट्यांनी पळविल्याची तक्रार आकाेट फैल पाेलीस ठाण्यात दिली़ या तक्रारीवरून पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला़ आकाेट फैल पाेलिसांना मिळालेल्या माहितीवरून पाेलिसांनी शुभम पुंडलिक माहाेरे, आनंद विलास वाघ, प्रफुल अनंता दरेकर, मुकेश श्रावण गवई चारही रा़ सांगवी माेहाडी व सय्यद वजीर सय्यद नजीर, गुलाम नबी गुलाम दस्तगीर दाेेघेही रा़ डाबकी राेड या सहा आराेपींना संशयावरून ताब्यात घेतले़ त्यांची कसून चाैकशी केली असता या चाेरट्यांनी चाेरीची कबुली दिली़ त्यांच्याकडून विजेचे खांब तार व एम एच ३० एल ४६१५ क्रमांकाचे एक वाहन असा एकून चार लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त् करण्यात आला आहे़ ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आकाेट फैलचे ठाणेदार महेंद्र कदम, पीएसआय नितीन सुशीर, हरीश्चंद्र दाते, संजय पांडे, श्रीकांत पवार, अस्लम शहा, दिलीप इंगाेले यांनी केली़
वीजखांब चाेरीतील सहा आराेपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:19 AM