अकोला : रेल्वेची प्रवासी वाहतुक हळूहळू पूर्वपदावर येत असून, कोरोना काळात विशेष म्हणून धावत असलेल्या सहा जोडी रेल्वे गाड्यांचा विस्तार जून अखेरपर्यंत करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाड्या अकोला स्थानकारून जाणार्या असल्यामुळे अकोलेकरांची सोय झाली आहे.
गाडी क्रमांक ०२८१२ अप हटिया -लोकमान्य टिळक टर्मिनस (प्रत्येक शुक्रवार ) या विशेष गाडीचा विस्तार २५ जूनपर्यंत करण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०२८११ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया (प्रत्येक रविवार ) या गाडीचा विस्तार २७ जूनपर्यंत करण्यात आला आहे.
गाडी क्रमांक ०२१०२ अप हावडा -लोकमान्य टिळक टर्मिनस (प्रत्येक रविवार,गुरुवार ) या विशेष गाडीला १ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२१०१ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस- हावडा (प्रत्येक शुक्रवार,मंगळवार) या गाडीची मुदत २९ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे.
गाडी क्रमांक ०२८८० अप भुवनेश्वर -लोकमान्य टिळक टर्मिनस (प्रत्येक सोमवार,गुरुवार )ही गाडी आता २८ जूनपर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०२८७९ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर (प्रत्येक बुधवार,शनिवार )ही गाडी ३० जूनपर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०२८६६ अप पुरी -लोकमान्य टिळक टर्मिनस (प्रत्येक मंगळवार ) या गाडीचा विस्तार २९ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०२८६५ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस -पुरी (प्रत्येक गुरुवार) या गाडीचा विस्तार १ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे.
गाडी क्रमांक ०२८५७ अप विशाखापट्टणम -लोकमान्य टिळक टर्मिनस (प्रत्येक रविवार) या गाडीला २७ जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. गाडी क्रमांक ०२८५८ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम (प्रत्येक मंगळवार) या गाडीला २९ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०८५०१ अप विशाखापट्टणम -गांधीधाम (प्रत्येक गुरुवार) ही विशेष गाडी आता २४ जूनपर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०८५०२ डाऊन गांधीधाम-विशाखापट्टणम (प्रत्येक रविवार) ही गाडी २७ जूनपर्यंत धावणार आहे.