- प्रवीण खेतेअकोला : वैद्यकीय विद्यार्थ्यांसह अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रशिक्षण देण्यासाठी अकोल्यासह राज्यातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘स्किल लॅब’ची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना पहिल्या टप्प्यातील निधी प्राप्त झाला असून, नवीन शैक्षणिक सत्रापासून ही स्किल लॅब उपयोगात आणली जाण्याची शक्यता आहे.नवीन शैक्षणिक सत्रापासून वैद्यकीय अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदल होणार आहेत. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) आदेशानुसार, अभ्यासक्रमात कौशल्य शिक्षणावर जास्त भर राहणार आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांसोबतच अत्यावश्यक वैद्यकीय सेवेत कार्यरत कर्मचाºयांनाही प्राथमिक रुग्णसेवेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘लाइफ सपोर्ट कोर्स आणि बेसिक लाइफ सपोर्ट कोर्स’च्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी देशभरात १४० स्किल लॅब प्रस्तावित आहेत. यापैकी सहा स्किल लॅब महाराष्ट्र राज्यात होणार आहेत. यासाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पहिल्या टप्प्यात १कोटी ४० लाखांचा निधी मिळाला आहे. इतरही वैद्यकीय महाविद्यालयांना यासाठी पहिल्या टप्प्यातील निधी मिळाला आहे.या शहरात होईल स्किल लॅब
- पुणे
- मुंबई
- मिरज
- अकोला
- नांदेड
- सोलापूर
काय आहे उद्देश?वैद्यकीय विद्यार्थ्यांसह नर्सिंग, वैद्यकीय कर्मचारी, एएनएम, आशा वर्कर्स तसेच रुग्णवाहिकेतील डॉक्टरांना उपचारासंदर्भात प्रशिक्षण देणेअसे असेल कौशल्य शिक्षण
- रुग्णाला इंजेक्शन, सलाईन देणे
- सीपीआर देणे
- श्वसन नलिका, अन्ननलिका, हृदयावर उपचार
- शारीराच्या इतर महत्त्वाच्या अंगांवर प्रथमोपचारासंदर्भात प्रशिक्षण
- अशी असेल स्किल लॅब
- किमान चार रुग्ण तपासणी कक्ष
- प्रशिक्षणासाठी १०० विद्यार्थ्यांची क्षमता
- कौशल्य शिक्षणासाठी डमी बॉडीचा होणार उपयोग
- व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि पुनरावलोकनाची सुविधा
नवीन शैक्षणिक सत्रापासून वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये कौशल्य शिक्षणावर जास्त भर राहणार आहे. त्यासाठी एमसीआयच्या निर्देशानुसार, स्किल लॅब निर्माण करण्यात येणार आहे. याद्वारे वैद्यकीय विद्यार्थ्यांसह अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणाºया कर्मचाºयांनाही डमी बॉडीच्या आधारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.