दर दोन तासांनी बदला कड
पालथे झोपल्याने फुफ्फुसांमध्ये रक्तपुरवठा जास्त होतो. त्यामुळे रक्तपुरवठ्यासोबतच रक्तातील ऑक्सिजनदेखील फुफ्फुसांपर्यंत पोहोचते. परिणामी फुफ्फुसातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
अशा परिस्थितीत केवळ पालथे झोपून चालणार नाही, तर दर दोन तासांनी एका कडेवरून दुसऱ्या कडेवर झाेपणे तसेच काही वेळ पालथे झोपणे या पद्धतीने झोपल्यास फुफ्फुसातील सर्वच भागात चांगल्या पद्धतीने रक्तपुरवठा होण्यास मदत होते. परिणामी ऑक्सिजन पातळीही वाढण्यास मदत होते.
फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होते मदत
कोविडचा संसर्ग झाल्यानंतर सर्वप्रथम फुफ्फुसाचे खालचे भाग संसर्गाने प्रभावित होतात. पालथे झोपल्याने या भागात रक्तपुरवठा जास्त हाेतो. तसेच डाव्या आणि उजव्या कडेवर झोपल्यास दोन्ही बाजूंनी, अशा प्रकारे फुफ्फुसांच्या सर्वच भागांना रक्ताचा पुरवठा होतो. पर्यायाने फुफ्फुसांमध्ये रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा होताे.
- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, विभाग प्रमुख, मेडिसीन, जीएमसी
गर्भवतींनी पालथे झोपणे टाळावे
गर्भधारणा झालेली असेल, तर अशा महिनांनी पालथे झोपणे टाळावे. तसे शक्यही नाही. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण राखण्यासाठी गर्भवतींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- डॉ. श्यामकुमार सिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला
फुफ्फुसाचे आरोग्य चांगले राहते
पालथे झोपल्याने फुफ्फुसांमध्ये रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होऊ लागतो. परिणामी रक्तासोबत ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते. त्यामुळे कोेविड संसर्गामुळे प्रभावित झालेल्या भागातही ऑक्सिजन पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, अशांनी पालथे झोपण्यासह दर दोन तासांनी उजव्या आणि डाव्या कडेवर झोपावे. त्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्यही चांगले राहते.
- डॉ. सागर थोटे, छातीरोग तज्ज्ञ, अकाेला