अकोला : बाजार समितीत गव्हाची आवक सुरू आहे. मंगळवारी गव्हाच्या दरात किंचित वाढ पहावयास मिळाली. गव्हाचे दर १,७०० रुपये प्रति क्विंटलवरून १,८५० प्रति क्विंटलवर पोहोचले. मागील आठ दिवसांत पहिल्यांदाच ही वाढ नोंदविल्या गेली. बाजार समितीत गव्हाची ४५० क्विंटल आवक झाली होती.
----------------------------------------------
उन्हाळी मका बहरला
अकोला : जिल्ह्यातील २५७ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. सरासरी ४३० हेक्टर क्षेत्रात मका लागवड होण्याची शक्यता होती; मात्र यामध्ये घट पहावयास मिळाली. यंदा सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकल्याने उन्हाळी मका बहरला आहे.
------------------------------------------------
१६५ एकरात वैरण लागवड
अकोला : वैरण विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रकल्प क्षेत्रातील गो पालकांपैकी निवडलेल्या लाभार्थींनी १६५ एकरात वैरण पिकांची लागवड केली आहे. त्याकरिता पशुसंवर्धन कार्यालयाकडून ४८००, २४०० व १२०० रुपये अनुदान देण्यात येत आहे.
-----------------------------------------------------
सॅनिटायझर मशीन बंद
अकोला : येथील जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातील सॅनिटायझर मशीन बंद आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मशीन बंद असल्याने निर्जंतुकीकरण न करता कार्यालयात प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे ही मशीन सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
-----------------------------------------------------
हरभरा खरेदीसाठी ६,६६० शेतकऱ्यांची नोंदणी
अकोला : जिल्ह्यात मार्केटींग फेडरेशनमार्फत हमीभावाने सात केंद्रावर हरभरा खरेदी सुरू आहे. आतापर्यंत ६ हजार ६६० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तर ४ हजार ४८० शेतकऱ्यांच्या मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले आहे.
-------------------------------------------------------