लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सीसीआय तसेच कापूस पणन महासंघाकडून शनिवारपर्यंत जिल्ह्यातील ३२,५३७ शेतकऱ्यांचा ९ लाख ८२ हजार १५३ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांचा कापूस पावसाळ्यापूर्वी खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू आहे. त्यासाठी शेतकºयांनी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नोंदणी केली आहे. त्यानुसार सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेत आतापर्यंत बºयापैकी कापूस खरेदी झाला आहे. कापूस पणन महासंघाकडून ४,३३८ शेतकºयांचा १ लाख २१ हजार ९८५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. ‘सीसीआय’कडून २८,१९९ शेतकºयांचा ८ लाख ६० हजार १६८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. ही संख्या पाहता जिल्ह्यात बºयापैकी कापूस खरेदी झाला आहे. त्याचवेळी हजारो शेतकºयांकडे कापूस शिल्लकही आहे. त्यांना नोंदणीसाठी २६ मेपर्यंत संधी देण्यात आली आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली; मात्र जिनिंग प्रेसिंग युनिट सुरू झालेले नव्हते. कापूस खरेदीकामी काही जिनिंग प्रेसिंग युनिटधारक कापूस पणन महासंघ व सीसीआय यांना सहकार्य करीत नसल्याचे प्रकार घडले आहेत. जिल्ह्यातील शेतकºयांकडे असलेला कापूस पावसाळ्यापूर्वी खरेदी करण्यासाठी प्रत्येक केंद्रात दर दिवशी किमान २०० शेतकºयांचा कापूस खरेदी करणे आवश्यक आहे. त्यासाठी दैनंदिन कापूस खरेदीसाठी गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.