अकाेला काेराेनाचा संकट वाढतच असून, सरकार आराेग्य सुविधा पुरविण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळेच पुन्हा लाॅकडाऊनचा बागुलबुवा उभा केला जात आहे. आता कुठे अर्थचक्र सुरळीत हाेण्याच्या मार्गावर असताना, पुन्हा लाॅकडाऊन लावले, तर वंचित बहुजन आघाडी लाॅकडाऊन हाणून पाडेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी दिला विश्रामगृह येथे आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ते म्हणाले की, लाॅकडाऊन हा पर्याय नाही. सरकारने आराेग्य सुविधा वाढविण्यावर भर द्यावा, इतर प्रतिबंधात्मक उपाय करावेत. लाॅकडाऊनमुळे सामान्य माणूस भरडला जाताे. हातावर पाेट असणाऱ्यांचे हाल हाेतात. त्यामुळे गर्दीत काेराेना वाढत असेल, तर गर्दी नियंत्रित करण्याचा केवळ लाॅकडाऊन हाच मार्ग नाही. आता पुन्हा लाॅकडाऊन लावले, तर वंचित आघाडीचे कार्यकर्ते लाॅकडाऊन माेडून काढतील, असा इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.धैर्यवर्धन फुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रसिद्धी प्रमुख डॉ.प्रसन्नजीत गवई, जि.प. गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, चंद्रशेखर पांडे गुरुजी, शंकराराव इंगळे, आकाश सिरसाट, पराग गवई, राम गव्हाणकर आदी उपस्थित हाेते.
...तर लाॅकडाऊन माेडून काढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:19 AM