शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

शहरातील रस्ते कामांचे होणार ‘सोशल आॅडिट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:17 PM

अकोला : शासनाच्या वैशिष्ट्येपूर्ण निधीतून अकोला शहरात पूर्ण करण्यात आलेल्या रस्ते कामांसह सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे शासनाच्या निधीतून करण्यात येणारी रस्त्यांची कामे गुणवत्तेप्रमाणेच पूर्ण होणे आवश्यक आहे. शहरात पूर्ण करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने करण्यात येणार आहे. संयुक्त पथकाकडून रस्ते कामांच्या अंदाजपत्रकात नमूद केलेल्या तांत्रिक व आर्थिक बाबींची तपासणीही करण्यात येणार आहे.

अकोला : शासनाच्या वैशिष्ट्येपूर्ण निधीतून अकोला शहरात पूर्ण करण्यात आलेल्या रस्ते कामांसह सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे. बिगर राजकीय अकोलेकर नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून रस्ते कामांचे आॅडिट करण्यात येणार असल्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी काढले.अकोला शहरातील रस्ते विकास कामांसह मनपा हद्दवाढीत समाविष्ट भागात नागरी सोयी-सुविधांच्या विकास कामांकरिता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडून विशेष अर्थसहाय्य योजनेंतर्गत निधी प्राप्त करून दिला आहे. शासनामार्फत खड्डेमुक्त रस्ते अभियान राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे; परंतु मागील एक वर्षात अकोला शहरात काँक्रिटीकरण करून कामे पूर्ण करण्यात आलेले रस्ते ठिकठिकाणी खराब झाल्याचे दिसून येत आहे. वर्षभरातच रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शासनाच्या निधीतून करण्यात येणारी रस्त्यांची कामे गुणवत्तेप्रमाणेच पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने शहरात पूर्ण करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने करण्यात येणार आहे. प्रशासनातील संबंधित अधिकाºयांसह कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेले अकोलेकर नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून शहरातील रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे, असे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १६ जुलै रोजी काढले.

पथकांमार्फत नमुने घेण्यात येणारशहरातील रस्ते कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये रस्ते कामांची, कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येणार असून, त्यासाठी पथकांमार्फत नमुने घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रथम नमुन्याची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकामार्फत करण्यात येणार आहे. द्वितीय नमुने तपासणी प्रसिद्ध, विश्वसनीय व नि:पक्ष अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पथकामार्फत करण्यात येणार आहे. तिसरी नमुने तपासणी शहरातील सिव्हिल इंजिनीअर झालेले विद्यार्थी जे इतर ठिकाणी नोकरीवर आहेत; मात्र त्यांना या कामात सहभाग देण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाकडे नाव नोंदणी करावी लागेल. चौथी नमुने तपासणी ज्या भागात रस्त्याची कामे सुरू आहेत, त्या भागातील नि:पक्ष असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनात व निरीक्षणात वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येणार आहे. पाचवी नमुने तपासणी जिल्हा प्रशासनाकडून गोपनीय पद्धतीने गोपनीय पथकाद्वारे व वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येणार आहे.तांत्रिक व आर्थिक बाबींचीही तपासणी!शहरातील रस्ते कामांच्या तपासणीत लेखाधिकारी व एक उप अभियंता यांच्या संयुक्त पथकाकडून रस्ते कामांच्या अंदाजपत्रकात नमूद केलेल्या तांत्रिक व आर्थिक बाबींची तपासणीही करण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी घेणार पाच ठिकाणचे नमुने!रस्ते कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये नमुना तपासणीत प्रारंभी जिल्हाधिकारी अथवा त्यांचे नामनिर्देशित अधिकाऱ्यांच्या निरीक्षणात प्रत्येक रस्त्यावरील पाच ठिकाणचे नमुने ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’मध्ये घेण्यात येतील. घेतलेले नमुने सीलबंद करून तपासणीसाठी संबंधित पथकाकडे दिले जातील. तसेच तपासणीत सर्व पथकांकडून घेण्यात आलेल्या नमुन्यांचे परीक्षण कोणत्या पद्धतीने व कोणत्या प्रयोगशाळेत करण्यात येणार, याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाºयांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

लोकप्रतिनिधींनीही व्यक्त केली नाराजी!मागील एक वर्षात पूर्ण करण्यात आलेले रस्ते जागोजागी खराब झाल्याच्या मुद्यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ही बाब प्रशासकीय कामकाजाला शोभणारी नसून, त्यामुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा मलीन होत असल्याचे, जिल्हाधिकाºयांनी परिपत्रकात म्हटले आहे.नमुन्यांची तपासणी होणार ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’मध्ये!शहरातील रस्ते कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये पथकांमार्फत नमुने घेण्यात येणार आहेत. नमुन्यांची तपासणी लोकाभिमुख पद्धतीने व्हावी, यासाठी नमुन्यांची तपासणी ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’मध्ये करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय