शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘समाजकल्याण’च्या कर्मचा-यांचे वेतनही काढले नाही!

By admin | Published: October 30, 2016 3:20 AM

वसतिगृह अनुदान वाटपातील घोळ; वित्त व लेखा विभागाने घेतला धसका.

अकोला, दि. २९- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातून वसतिगृहांना नियमबाह्यपणे वाटप झालेल्या अनुदानाच्या फायलींचा प्रचंड धसका वित्त व लेखा विभागाने घेतला. त्यामुळे वेतनाच्या फायलींनाही बाजूला ठेवत सर्वच कर्मचार्‍यांवर अविश्‍वास दाखवण्याचा प्रकार घडल्याने समाजकल्याण विभागातील कर्मचार्‍यांना दिवाळी विनावेतनाची साजरी करावी लागत आहे. समाजकल्याण विभागाच्या १५ वसतिगृहांना अनुदान वाटप करताना मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांनी कोणताही नियम किंवा फाईल सादर करण्याची प्रक्रिया पार पाडली नाही. लाखो रुपयांच्या अनुदानाच्या फायलींची देयक नोंदवही आणि कार्यालयीन नोंद कुठेच नाही. त्यामुळे या नियमबाह्य प्रकाराला नागर यांनाही जबाबदार धरत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कारणे दाखवा नोटिस बजावली. त्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिल्याची माहिती आहे. मात्र, हा प्रकार उघड झाला असताना समाजकल्याण विभागाच्या कर्मचार्‍यांना वेतन देण्याचीही फाइल त्यांच्याकडे सादर झाली. त्यावर समाजकल्याण विभागाच्या कर्मचार्‍यांबाबत नकारात्मक भूमिका घेत ती बाजूला ठेवण्यात आली. त्यामुळे या विभागातील अनेक कर्मचार्‍यांचे वेतनच झाले नाही. त्यांना दिवाळीतही वेतनाचा फायदा घेता आला नाही.