- संतोष येलकर
अकोला : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमिवर शासनामार्फत विविध योजनांचा निधी थांबविण्यात आला आहे. त्यामध्ये निधी उपलब्ध नसल्याने शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना रखडल्या असून, निधीअभावी राज्यातील लाभार्थींना योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असून, उपाययोजनांच्या कामांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येत आहे. त्यानुषंगाने शासनामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांचा निधी थांबविण्यात आला आहे. त्यामध्ये शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांचा निधी गत मार्चपासून राज्यातील जिल्हा स्तरावर उपलब्ध झाला नसल्याने, समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजना रखडल्या आहेत. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात राज्यातील लाभार्थींना समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.निधीअभावी अशा रखडल्या योजना!कोरोना संकटाच्या पृष्ठभूमिवर निधीअभावी समाजकल्याण विभागाच्या योजना रखडल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, अनुसूचित जातीच्या बचत गटांना ट्रॅक्टर वाटप योजना, अॅट्रॉसिटी प्रकरणात पीडित व्यक्तींना अर्थसहाय्य योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना इत्यादी योजना रखडल्या आहेत.कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमिवर समाजकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त होणे प्रलंबित आहे. त्यामुळे योजना रखडल्या असून, शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थींना योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.-अमोल यावलीकरसहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, अकोला.