अकोला : भारतात जन्माला आला म्हणून भारतीय, वेदांचा अभ्यास करणारा वैदिक, तर ज्याचा अंत नाही अशा धर्माला मानणारा सनातनी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि इतर मिळून जो निर्माण होतो, तो हिंदू समजला जातो. हिंदू धर्माला कमी लेखणार्यांना धडा शिकविण्यासाठी प्रभू श्रीरामाने अवतार घेतला होता. र्मयादापुरुषोत्तम श्रीरामाने धनुष्य हाती घेऊन दुष्टांचा संहार केला. सज्जनतेचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या श्रीरामासमान प्रत्येकाने सज्जन व्हावे, असे प्रतिपादन आचार्य गोविंददेव गिरी महाराज यांनी केले. विश्व हिंदू परिषदेचा सुवर्ण जयंतीनिमित्त रविवार, १ फेब्रुवारी रोजी दुपारी तापडिया नगरातील भारत विद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात पार पडलेल्या विश्व हिंदू संमेलनात आचार्य बोलत हो ते. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने वचन दिले आहे की, जेव्हा जेव्हा धर्माचे अध:पतन होईल, तेव्हा मी अवतार घेईल. आता ती वेळ समीप आली असून, लवकरच भगवंताला धर्माच्या रक्षणासाठी अवतार घ्यावा लागेल. त्यासाठी आपलेदेखील योगदान तितकेच महत्त्वाचे ठरते. हे योगदान विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून युवा वर्गाकडून मिळत आहे. संतांच्या विचार विर्मशानंतरच विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली. उन्नती आणि शांती प्रदान करणारा तसेच सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा धर्मच अस तो, असे त्यांनी यावेळी सांगितले. संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधांशू महाराजदेखील यावेळी उ पस्थित होते. सेंद्रिय शेती तज्ज्ञ मधुकर सराफ, विहिंपचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर, प्रांत सहप्रमुख मा तृशक्ती अंजलीताई देशकर तसेच हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलाश अग्रवाल होते. उद्घाटक म्हणून डॉ. अविनाश पाटील होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जैन मुनी अजितशेखर सुरीश्वर महाराज, खासदार संजय धोत्रे, आमदारत्रयी गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर व हरीश पिंपळे, महापौर उज्ज्वलाताई देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, सनत गुप्ता, ममता चिंचवडकर, राहूल राठी आदी उपस्थित होते. ह्यहिंदू संवेदनाह्ण या पुस्तकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संचालन प्रकाश घोघलिया, प्रकाश लोढिया आणि प्रमोद राठी यांनी केले. कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
धर्माचे अध:पतन रोखण्यासाठी समाजाचे योगदान महत्त्वाचे!
By admin | Published: February 02, 2015 1:53 AM