शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

५७ विद्यालये, महाविद्यालयांमध्ये लघू माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:16 PM

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण व विस्तार विभागाद्वारे विद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये लघू माती व पाणी प्रयोगशाळांचा एक नावीन्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण व विस्तार विभागाद्वारे विद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये लघू माती व पाणी प्रयोगशाळांचा एक नावीन्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील ५७ विद्यालये, महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविल्यानंतर आता पातूर तालुक्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत लघू माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहे.शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, कौशल्यवृद्धी आणि उत्पादकता वाढीच्या दृष्टिकोनातून मानव विकास कार्यक्रमांतर्गत पातूर तालुक्यात अनुदानित विद्यालये, कनिष्ठ महविद्यालये लघू माती व पाणी प्रयोगशाळा प्रशिक्षणासह स्थापन करण्यात येणार आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण व विस्तार विभागाद्वारे जिल्ह्यातील ५७ विद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये लघू माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या. हाच प्रकल्प मानव विकास कार्यक्रमांतर्गत पातूर तालुक्यात राबविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी लागणाºया निधीची संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीने जिल्हाधिकाºयांना ५१ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने पातूर तालुक्याची आर्थिक मर्यादा विचारात घेऊन २६.८८ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. तालुक्यातील २१ विद्यालये, महाविद्यालयांमध्ये लघू माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे. तालुक्यातील शेतकºयांना माती व पाणी याबाबत योग्य माहिती मिळावी आणि उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाcollegeमहाविद्यालय