तेल्हारा-बेलखेड-हिवरखेड रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून स्थगित असून, अपूर्ण झाले आहे. या रस्त्यांवर मोठमोठे अपघात होऊन अनेकांना जीवसुद्धा गमावला आहे. सद्यस्थितीत रस्त्यावर टाकण्यात येत असलेल्या पिवळ्या मातीमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. तसेच वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे काम त्वरित व दर्जेदार व्हावे यासाठी नागरिकांनी आंदोलने केली, परंतु रस्त्यावर पिवळी माती टाकल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. रस्त्याचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी तहसीलदारांना यांना केली आहे. (फोटो)
-------------------
बेलखेड येथील नागरिकांनी संपर्क साधून रस्त्यावर पिवळी माती टाकण्याबाबत सांगितले आहे. मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पिवळी माती टाकण्याबाबत विचारणा करुन माती टाकण्याचे काम थांबवण्याचे सांगितले आहे.
-डॉ. संतोष येवलीकर,
तहसीलदार तेल्हारा.