अकोला: विदर्भातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना सक्तीची न करता पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी देण्यात यावी, अशी मागणी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.राज्यात शेती पंपास पारंपरिक वीज जोडणी देणे बंद करण्यात येऊन मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत विशेष अनुदानासह वीज जोडणी देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच डीपी पासून ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर (सुमारे १० पोल) असलेल्या जोडणीधारकास पारंपरिक वीज जोडणीऐवजी सौर कृषी पंप जोडणी सक्तीचे केले आहे. विदर्भातील प्राकृतिक संरचना व हवामान लक्षात घेता शेतकरी पर्जन्यावर आधारित शेती करतात. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने बारमाही सिंचन शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने बारमाही सिंचन शेती करता येत नाही त्यामुळे अल्प व संरक्षित सिंचनाशिवाय शेतकºयांना पर्याय नाही त्यामुळे शेतकरी वाडी/वस्ती व शिवारात मुक्कामास नसल्याने सौर कृषी पंपांसाठी लागणाºया सौर पॅनलच्या सुरक्षा व संरक्षणासाठी चिंतीत असल्याने त्याचा पारंपरिक वीज जोडणीकडे कल आहे. सौर वीज जोडणीच्या पॅनलची देखरेख, खर्च, परिरक्षण याबाबत शेतकºयांची मानसिकता नसल्याने पारंपरिक वीज जोडणीसाठी शेतकºयांची मागणी आहे. अपारंपरिक ऊर्जा वापर करणे काळाची गरज असली तरी सौर कृषी पंपास सौर ऊर्जाऐवजी पारंपरिक वीज जोडणी शेतकºयांची मागणी असल्याने सौर कृषी पंप योजना सक्तीची न करता ऐच्छिक असावी, या बाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास, माहिती व तंत्रज्ञान व दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री ना. बावनकुळे यांचे सोबत सविस्तर चर्चा केली. कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी महावितरणकडे पैसे भरण्यात आलेल्या व पारंपरिक वीज जोडणीसाठी मागणी असलेल्या शेतकºयांना शासनाने तातडीने वीज जोडणी देण्यात यावी या बाबत आ. रणधीर सावरकर यांनी सतत पाठपुरावा केला आहे.