अकोला : कोरोना विषाणू संसर्गामुळे एकमेव आधार असलेल्या अपत्याचा मृत्यू झाल्याने, निराधार झालेल्या पालकांचे काय आणि त्यांना कोण मदत करणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाने जिल्ह्यात अनेक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये आई-वडिलांचा एकमेव आधार असलेल्या अपत्याचा (मुलाचा) मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. परंतु एकमेव आधार असलेल्या मुलाचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे निराधार झालेल्या संबंधित पालकांसाठी अद्याप कोणतीही मदत जाहीर करण्यात आली नाही. एकमेव आधार असलेल्या अपत्य कोरोनाने नेले. त्यामुळे निराधार झालेल्या पालकांना (आई-वडिलांना) मदत कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे एकुलता एक मुलगा गमावलेल्या पालकांना मदत करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात येणार काय, याकडे आता लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण :
बरे झालेले रुग्ण :
सध्या उपचार घेत असलेले :
एकूण मृत्यू :
निराधार पालकांना
अर्थसाहाय्याची गरज!
कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पालकांचा आधार गेला. त्यामुळे निराधार झालेल्या अशा पालकांना (आईवडिलांना) शासनाने अर्थसाहाय्य करून आधार देण्याची गरज आहे, असे अकोला जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष नारायण अंधारे यांनी सांगितले.
ज्येष्ठांचे प्रश्न वेगळेच !
एकमेव आधार असलेल्या मुलाचा कोरानामुळे मृत्यू झाल्याने ज्येष्ठ नागरिक पालकांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो. शरीर थकलेले असल्याने उपचारासाठी दवाखान्यात कसे जाणार, औषध आणण्यासाठी कोणाचा आधार घेणार, तसेच दैनंदिन गरजा भागविण्यासाठी धावपळ कशी करणार, अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा सामना करण्याची वेळ ज्येष्ठ नागरिकांवर येते.