महापालिका क्षेत्रात भाैरद ग्रामपंचायतीमधील काही भाग समाविष्ट करून प्रभाग क्रमांक ८ अस्तित्त्वात आला. ग्रामीण भाग शहरी भागाला जाेडण्यात आल्यानंतर महावितरण कंपनीच्यावतीने या ठिकाणी अद्याप ग्रामीणच्या निकषानुसार विद्युत पुरवठा केला जात आहे. प्रभागात अनेक ठिकाणी विद्युत खांबांमधील अंतर जास्त असून, नागरिकांना दीडशे ते दाेनशे मीटर अंतरापर्यंत केबल टाकावी लागत आहे. यामुळे प्रभागात निकषानुसार विद्युत खांब टाकण्यासाठी सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्युत दाब कमी असल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित हाेत आहे. त्यामुळे या भागात उच्च दाबाच्या ट्रान्सफार्मरची व्यवस्था करण्याची गरज आहे. तसेच काेराेनामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता वीज देयक टप्प्याटप्प्याने अदा करण्याची तरतूद करावी, अशी मागणी भाजप नगरसेविका रंजना विंचनकर यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे केली. यावेळी भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख सुनील उंबरकर, सुधीर चिणे, ज्ञानेश्वर बोदडे, श्याम विंचनकर आदी उपस्थित होते.
प्रभाग ८ मधील विद्युत समस्या निकाली काढा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:13 AM