मूर्तिजापूर (जि. अकोला): मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या धानोरा पाटेकर येथे पिता-पुत्रात वाद होऊन यामध्ये मुलाने वडीलांच्या डोक्यात लोखंडी सळईने वार केल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी रात्री घडली.या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा येथील महादेव जंगलूजी उईके (६०)हे घरी असताना त्यांनी मोठा मुलगा नागोराव यास सोयाबीन पिकाला पाणी देण्यासाठी सांगितले. दरम्यान, लहान मुलगा साहेबराव महादेव उईके (३४)याने वाद घालून थेट वडील महादेव उईके यांच्या डोक्यात लोखंडी सळईने वार केला. त्यात महादेव उईके गंभीर झाले.महादेव उईके यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन मूर्तिजापूर येथे १७ सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल केली आहे. यावरून पोलीसांनी आरोपी विरूद्ध भादंविच्या ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गजानन थाटे, शिपाई तेजराव तायडे करीत आहेत.(शहर प्रतिनिधी )
मुलाने वडीलांच्या डोक्यावर केला लोखंडी सळईने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:27 IST