शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला क्रिकेट पंच; बीसीसीआय नॅशनल पॅनलवर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 1:09 PM

-नीलिमा शिंगणे -जगड अकोला : खेळाप्रती प्रेम आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी या गुणांच्या बळावर शेतकऱ्याच्या मुलाने क्रिकेट पंचाची परीक्षा ...

-नीलिमा शिंगणे -जगडअकोला: खेळाप्रती प्रेम आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी या गुणांच्या बळावर शेतकऱ्याच्या मुलाने क्रिकेट पंचाची परीक्षा उत्तीर्ण केली. या मुलांची बीसीसीआय नॅशनल अंपायर पॅनलवर निवड झाली आहे. या मुलाचे नाव आहे मयूर माधवराव वानखडे.विदर्भातील नागपूर येथे देशातील १,४०० क्रिकेट पंचाची परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात आली होती. यामधून केवळ १७ उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली. यामध्ये महाराष्ट्रातील तीन जणांचा समावेश आहे. दोन मुंबईचे आणि एक अकोल्याचा मयूर. मयूरला लहानपणापासून क्रिकेट खेळाडू होण्यापेक्षा पंच म्हणून कामगिरी क रावी, असे वाटत होते. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पंच होण्याकरिता अकोला क्रिकेट क्लब येथे प्राथमिक धडे घेतले. भारत विद्यालय आणि जागृती विद्यालय येथे शालेय शिक्षणानंतर पुणे येथील एमआयटीमध्ये शिक्षण घेऊन बी.ई. (कॉम्प्युटर) पदवी घेतली; मात्र क्रिकेट पंच होण्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्याने पूर्णवेळ क्रिकेट पंच होण्यासाठी अभ्यासाकरिता दिला. मयूरचे वडील माधवराव शेती करतात. आई अरुणा जिल्हा परिषदमध्ये शिक्षिका आहे. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मयूर क्रिकेटकडे लक्ष देऊ शकला.मयूरने आतापर्यंत १५० क्रिकेट सामन्यात पंच म्हणून काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा समावेश आहे. जून २०१३ मध्ये पहिल्यांदा पुणे जिल्हा असोसिएशनच्या सामन्यांमध्ये पंच म्हणून मयूरने काम केले. २०१४ मध्ये श्रीविष्णू तोष्णीवाल चषक, २०१५ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेट पॅनल परीक्षा उत्तीर्ण केली. २०१६ मध्ये बीसीसीआय लेव्हल वन परीक्षा उत्तीर्ण केली. २०१७ मध्ये बीसीसीआय रिफ्रेशर परीक्षा, जून २०१८ मध्ये बीसीसीआय लेव्हन टू परीक्षा (थेअरी) उत्तीर्ण होऊन प्रात्यक्षिकसाठी पात्रता सिद्ध केली. आॅक्टोबर २०१८ मध्ये बीसीसीआय लेव्हल टू परीक्षेत सर्वाधिक गुणांनी यश मिळवून, बीसीसीआयच्या नॅशनल पॅनलमध्ये अंपायर म्हणून मयूरची निवड झाली. या निवडीबरोबरच मयूरचे उच्च कोटीचे क्रिकेट अंपायर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. स्टीव्ह बकनोर, डेव्हीड शेफर्ड, श्रीनिवास व्यंकटराघवन यासारख्या उच्च कोटीचा अंपायर मयूरला व्हायचे आहे.

‘माझ्या यशामध्ये माझी आई, वडील आणि पत्नीचा मोठा वाटा आहे. हे तिघेही माझ्या जीवनाचे स्तंभ आहेत. ’-मयूर वानखडे, क्रिकेट अंपायर

 

टॅग्स :AkolaअकोलाBCCIबीसीसीआय