लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत जिल्ह्यातील गर्भवती महिलांच्या सोनोग्राफी करण्यासाठी खासगी रुग्णालयांनी आरोग्य विभागासोबत करारनामे करण्याच्या सूचना प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शुक्रवारी दिल्या.पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाचे अधिकारी आणि स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञांच्या बैठकीत ते बोलत होते. अनेक गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी करण्यात येत नाही. त्यामुळे पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत जिल्ह्यातील गर्भवती महिलांची सोनोग्राफी करण्याकरिता जिल्ह्यातील डॉक्टरांनी सहभागी होण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकार्यांनी केले. तसेच गर्भवती महिलांची सोनोग्राफी करण्यासाठी खासगी रुग्णालयाच्या स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडे करारनामे करण्याच्या सूचनाही अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिल्या. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘गर्भवतीं’च्या सोनोग्राफीचे करारनामे करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 2:00 AM
अकोला : पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत जिल्ह्यातील गर्भवती महिलांच्या सोनोग्राफी करण्यासाठी खासगी रुग्णालयांनी आरोग्य विभागासोबत करारनामे करण्याच्या सूचना प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शुक्रवारी दिल्या.
ठळक मुद्देअपर जिल्हाधिकार्यांच्या सूचना पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजना