संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अंध विद्यार्थ्यांना स्पर्शज्ञान आवाजाने बागेतील खेळणी हाताळता यावी आणि त्याचा निखळ आनंद घेता यावा, यासाठी श्री शिवाजी इंजिनिअरिंगच्या आर्किटेक्चर शाखेतील विद्यार्थ्यांंनी मलकापूरच्या कन्नूभाई वोरा अंध विद्यालयात सेन्सरी गार्डनची निर्मिती केली आहे. हैदराबादच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या सेन्सरी गार्डनचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनी करण्यात आले. त्यामुळे अत्याधुनिक असलेल्या या अंध विद्यालयातील शेकडो विद्यार्थी सेन्सरी गार्डनचा उपभोग घेणार आहेत.देशभरातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या आर्किटेक्चर शाखेतील विद्यार्थ्यांंना दरवर्षी सामाजिक परिणामाचा सामूहिक प्रकल्प तयार करायचा असतो. वेगळ्या पद्धतीचा प्रकल्प तयार करण्यासाठी अकोला बाभूळगाव येथील श्री शिवाजी इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे द्वितीय व तृतीय वर्षांंच्या विद्यार्थ्यांंनी अनेक ठिकाणी भेटी दिल्यात. दरम्यान, या विद्यार्थ्यांंची चमू मलकापूरच्या कन्नूभाई वोरा अंध विद्यालयात पोहोचली. स्पर्शज्ञानाने जीवन व्यतित करणार्या विद्यार्थ्यांंसाठी गार्डन तयार करण्याची संकल्पना सुचली. विद्यार्थी चमूचे प्रमुख स्नेहवर्धन गायकवाड आणि गौरव साधवाणी यांनी सेन्सरी गार्डन निर्मितीला सुरुवात केली. अंध असलेले विद्यार्थी केवळ स्पर्शानेच नव्हे, तर वस्तू आणि व्यक्तीच्या आवाजाच्या दिशेनेही वेध घेतात, ही बाब त्यांना प्रात्यक्षिकातून कळली. त्यानंतर तब्बल तीन दिवस ६0 विद्यार्थ्यांंची चमू या अंध विद्यार्थ्यांंच्या स्वभावावर अभ्यास करीत राहिली. त्यानंतर हैदराबाद येथील सेन्सरी गार्डनची माहिती घेत प्रयोग सुरू केलेत. जमिनीचे स्ट्रक्चर तपासून परिसराची स्वच्छता केली गेली. आराखडा तयार केला गेला. त्यानंतर लॉन, लायटिंग, स्टॅच्यू, विंगचेन, भौगोलिक नकाशे, इम्बोसिंग, अंधाच्या लिपीतून सूचना तयार करण्यात आल्यात. ही सर्व निर्मिती टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आली. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के. देशमुख, विभाग प्रमुख दिलीप जडे आणि अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एम. भोंगाडे, दिलीप म्हैसने, शेख भोंबडे, संदीप गुळाखे, अमोल नसुरडे, सुरेशभाई शाह यांचे मार्गदर्शन मोलाचे सिद्ध झाले. गत तीन महिन्यांपासून सतत परिश्रम घेत आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांंनी सेन्सरी गार्डन तयार केले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्यदिनी करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रकल्पाचा सहभागसवरेत्कृष्ट ठरणार्या समूह प्रकल्पास आंतरराष्ट्रीय नासातर्फे दरवर्षी एएनडीसी ट्रॉफी दिली जाते. गेल्या ६0 वर्षांंपासून या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका या देशातील ऑर्किटेक्चरचे विद्यार्थी सहभागी होत असतात.