अकोला: नागरिकांसाठी राखीव असलेल्या ह्यओपन स्पेसह्णवर अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या इमारतीला जेसीबीचा धक्का लागताच ती अक्षरश: पत्त्यासारखी कोसळल्याची घटना मंगळवारी बिर्ला कॉलनीत घडली. मनपाने केलेल्या कारवाईत असा प्रकार पहिल्यांदाच घडला असून, यानिमित्ताने संभाव्य मोठी दुर्घटना टळली, हे निश्चित मानले जात आहे.बिर्ला कॉलनीमध्ये सन्मित्र शाळेजवळ परिसरातील नागरिकांसाठी राखीव असलेल्या ह्यओपन स्पेसह्णवर मधुकर रामभाऊ गवई नामक इसमाने अनधिकृतरीत्या इमारत उभारली. खुल्या जागेवर उभारलेल्या इमारतीचा नकाशा मनपाने कसा मंजूर केला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ह्यओपन स्पेसह्णवरील अनधिकृत इमारत मनपाने तातडीने हटवण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने दिले होते. साहजिकच, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर मनपा प्रशासनाने इमारतींसंदर्भात तातडीने कारवाई करणे अपेक्षित होते. अखेर मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दखल घेत क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे यांना सदर इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मंगळवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन विभागाचा ताफा या ठिकाणी धडकला आणि कारवाईला सुरुवात केली. जेसीबीने धक्का लावताच अतिशय निकृष्ट बांधकाम झालेली चार मजली इमारत अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली. यामुळे परिसरात प्रचंड धुराळा उडाला होता. अचानक घडलेल्या प्रकारामुळे मनपा कर्मचार्यांसह स्थानिक रहिवासी अचंबित झाले.
जेसीबीचा धक्का लागताच पत्त्यासारखी कोसळली इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2016 2:25 AM