अकोला : वऱ्हाडातील खारपाणपट्ट्यात यावषीच्या खरीप हंगामात ज्वारी पेरा वाढविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रयत्न सुरू केले असून,कृषी विद्यापीठ संशोधीत बियाणे शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. मान्सूपूर्व शेतकरी मेळाव्यात अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीचे बियाणे खेरदी केले.ज्वारी हे शाश्वत पीक आहे. यात सर्वाधिक पोषणमूल्य सुरक्षा असल्याने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारीवर नवे संशोधन केले. नुकतेच पारंपरिक ज्वारीपेक्षा दीडपट उत्पादन देणारी एसपीव्ही-२३०७ ही ठोकळ दाण्याची जात विकसित केली असून, राष्ट्रीय स्तरावर उपयुक्त असलेल्या या जातीच्या प्रसारणासाठी कृषी विद्यापीठाने भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे (आयसीएआर) शिफारस केली होती. या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत ११ ज्वारीच्या जाती विकसित केल्या आहेत. ‘कल्याणी’ ही जात उत्तम असून, ११५ दिवसांत परिपक्व होणाºया या ज्वारीचे हेक्टरी ४० क्ंिवटल उत्पादन आहे. या ज्वारीपासून हेक्टरी १४० क्ंिवटल प्रथिनेयुक्त वैरणही मिळते. सीएसएच-३५ कृषी विद्यापीठाची ज्वारीची जात याच वर्षी भारतीय कृषी संशोधन परिषदेने राष्टÑीय स्तरावर प्रसारित केली. ‘हुरड्या’ची लज्जत वाढविणारी ‘पीकेव्ही कार्तिकी’ ही नवी जात या कृषी विद्यापीठाने महाराष्टÑाला दिली. ८२ दिवसांत हुरडा देणाºया ‘कार्तिकी’चे उत्पादत तर हेक्टरी ४५ ते ४८ क्ंिवटल आहे.कृषी विद्यापीठ संशोधीत ज्वारीच्या जाती भरघोस उत्पादन देणाºया असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे. खारपाण पट्टयात या ज्वारीपासून चांगले उत्पादन मिळेल तर मिळेलच गुरांच्या वैरणाचा प्रश्न सोडवण्यास मदत होर्हल. या अनुषगांने खारपाणपट्ट्यात ज्वारी पेरणीसाठी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
- खरीप व रब्बी ज्वारी पेरणीसाठी खारपाणपट्ट्यात पोषक वातावरण आहे. याच अनुषंगाने या भागात ज्वारीचा पेरा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे या भागातील गुरांच्या वैरणाचा प्रश्नही सुटेल.डॉ. व्ही.एम.भाले.कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.