डोंगरगाव : येथून जवळच असलेल्या सिसामासा येथे शेतकऱ्यांना खरीपपूर्व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहायक नागेश खराटे यांनी सोयबीन बियाण्यांची उगवणशक्ती तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन केले.
शेतरस्त्यांची दुरवस्था!
बाेरगाव : परिसरातील शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात नरकयातना सहन कराव्या लागतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी शेतरस्त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे.
ग्रामस्थ बेफिकीर; प्रशासन सुस्त!
खरप : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असूनही गावात सर्वच व्यवहार सुरू असून, नागरिक बिनधास्त फिरत असल्याचे चित्र आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
वणी रंभापूर येथे ग्रा.पं.मार्फत गावात फवारणी
वणी रंभापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘माझे गाव, माझी जबाबदारी’अंतर्गत ग्राम वणी रंभापूर राजापूर येथे सरपंच रमा सरकटे यांच्या पुढाकाराने गावात सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी नुकतीच करण्यात आली आहे.
अकोट येथे कोविड उपचार केंद्र कार्यान्वित
अकोट : येथील ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे ऑक्सिजन व्यवस्था असलेले कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री बच्चू कडू यांनी रुग्णालयाची पाहणी करून अधिकाऱ्यांना ऑक्सिजन कमी पडू देऊ नका, असे आदेश दिले. त्यानुषंगाने येथील ऑक्सिजन प्लान्ट उभारणी प्रकिया सुरू करण्यात आली आहे.
खदाण स्मशानभूमीत सुविधा देण्याची मागणी
मूर्तिजापूर : येथील जुन्या वस्तीला लागून असलेल्या खदाण परिसरातील हिंदू स्मशानभूमीत नगर परिषदेने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी तथा नगराध्यक्षांकडे शनिवारी केली आहे. स्मशानभूमीमध्ये भराव टाकून पथदिवे लावावेत, स्वच्छता करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.