अकोला : पश्चिम विदर्भातील (वºहाड) पाच जिल्ह्यांत केवळ तीन ते चार टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या आहेत. दरम्यान, येत्या १ जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरू पाचा पाऊस राहील तर २ जुलै रोजी सार्वत्रिक पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाने दिली.वºहाडात अद्याप सार्वत्रिक पाऊस झाला नाही. काही भागात हा पाऊस पडत आहे. त्यामुळे ज्या भागात पाऊस पडला, त्या भागातील शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली आहे. वºहाडात खरिपाचे एकूण ३२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये साधारणत: दरवर्षी सोयबीन ११ ते १२ लाख व कापूस ९ ते १० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. यावर्षीही कृषी विभागाने हेच नियोजन केले. अजूनही पूरक पाऊस न झाल्याने शेतकºयांनी पेरण्या थांबविल्या आहेत. पाऊस अधून-मधून पडतो; पण त्याचे स्वरू प सार्वत्रिक नाही. बुधवारी अकोला शहर व तालुक्याच्या काही भागात पाऊस पडला. त्यामुळे या भागातील शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली आहे. शेतकºयांनी सुरुवातीला कापूस पेरणीवर भर दिला आहे.