अकोला : आधुनिक शेतीच्या युगात पारंपरिक पध्दतीने पेरणी करणे आता कठीण झाल्याने झटपट मशागत,पेरणी,डवरणीची कामे करण्यासाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने छोटे ट्रॅक्टरवर आधारित पेरणी,डवरणी यंत्र विकसीत केले. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचणार आहेत.अलकिडच्या काही वर्षापासून मजुरांची वाणवा जाणवत असून, शेतकºयांना शेती करणे,कसणे अवघड झाले आहे. याच पृष्ठभूमीवर कृषी विद्यापीठे, कृषी विभाग, यंत्राणे मशागत करण्यासह पेरणी, डवरणी करणाºया यंत्र विकासावर भर देत आहे. विदर्भ,मराठवाडा,खान्देशात कापसाचे पीक घेतले जाते परंतु हे पीक वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने कापूस वेचणी यंत्र निर्मितीवर या कृषी विद्यापीठाने काम सुरू केले आहे. अद्याप कापूस वेचणी यंत्र तयार झाले नसले तरी पेरणी,डवरणी, स्लॅशर,पावर कटर, अशी शेकडो यंत्र कृषी विद्यापीठाने विकसीत केली असून, या यंत्राच्या मागणीनुसार निर्मितीसाठी कृषी विद्यापीठाने अनेक यंत्र निर्मिती करणाºया कंपन्यासोबत सामंज्यस करार केला आहे.पेरणी व डवरणी यंत्राची नितांत गरज असल्याने छोट्या ट्रॅक्टरवर १८.५-२५ अश्वशक्ती चे हे यंत्र असून, या यंत्राव्दारे प्रतितास ०.४८५ हेक्टर क्षमता आहे. तसेच तण काढणी क्षमता ९०.०२ टक्के एवढी आहे. छोट्या ट्रॅक्टरवर चलीत विकसीत स्लॅशर विविध पिकांचे अवशेष व्यवस्थापन करण्यासाठी महत्वाचे आहे. ०.४०५ हेक्टर प्रति क्षमता असून, यंत्राची स्लॅशींग क्षमता ९८.२४ टक्के आहे. पावर कटर ऊस बेणे व कडबा कापणी करण्याकरीता अत्यंत महत्वाचे असे यंत्र आहे. हे यंत्र चालविण्यसाठी ०.२३ कि.वॅट एवढी लागते, या उर्जाक्षमतेत १८०० बेणे प्रतितास, वाळलेला कडबा ८० किलो प्रतितास तर हिरवा चारा ११० किलो प्रतितास काढल जातो.दरम्यान, या यंत्रासह शेतीसाठी महत्वाच्या तंत्रज्ञानाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. या शिफारशींच संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीने मान्यता दिली. या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत एकहजारावर तंत्रज्ञानाच्या शिफारशी केल्या असून, या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करीत आहेत.
- कृषी विद्यापीठाने अनेक कृषी प्रक्रिया, शेतीसाठी लागणारी यंत्र विकसीत केली असून, या यंत्राच्या विकासासाठी काही कंपन्यासोबत सामंज्यस करण्यात आला आहे. या यंत्रामुळे शेती क्षेत्रात क्रांती होइल.- डॉ. विलास भाले, कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.