शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

अकोल्यात ५० एकरावर रंगीत कापूस बियाणे पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:47 PM

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी ५० एकरावर रंगीत कापूस बियाणे पेरणी केली.

ठळक मुद्देरंगीत कापसाचे राज्यात पहिले संशोधन याच कृषी विद्यापीठाने केले आहे.यापासून १५० क्ंिवटल कापूस केंद्रीय कापूस तंत्रज्ञान (सीरकॉट) संस्थेला उपलब्ध करू न दिला जाणार आहे. संशोधन आता कामी येत असल्याने प्रयत्न फळाला आल्याचे कापूस तज्ज्ञांचे मत आहे.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी ५० एकरावर रंगीत कापूस बियाणे पेरणी केली. यापासून १५० क्ंिवटल कापूस केंद्रीय कापूस तंत्रज्ञान (सीरकॉट) संस्थेला उपलब्ध करू न दिला जाणार आहे. रंगीत कापसाचे राज्यात पहिले संशोधन याच कृषी विद्यापीठाने केले असून, कृषी विद्यापीठाकडे याचा जनुकीय संग्रह आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कापूस संशोधक डॉ. एल. डी. मेश्राम यांनी जंगली कापूस जातीवर संशोधन करू न खाक ी, तपकिरी रंगाची कापूस निर्मिती केली होती. त्यानंतर हे संशोधन मागे पडले असले तरी कृषी विद्यापीठाने जनुक ीय संग्रह केला आहे. नागपूरच्या केंद्रीय कापूस (सीआयसीआर) संशोधन केंद्रानेदेखील रंगीत कापसाची जात विक सित केलेली आहे. आता नैसर्गिक रंगीत कापड उपलब्ध करू न देण्याचा निर्णय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने घेतल्याने पुन्हा या कापसाची पेरणी केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध असलेले रंगीत बियाणे यावर्षी कृषी विद्यापीठाच्या वणी रंभापूर येथील मुख्य बीजोत्पादन प्रक्षेत्रावरील ५० एकरावर पेरणी करण्यात आली आहे. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्थेला हा कापूस उपलब्ध करू न दिला जाणार आहे. या सर्व पृष्ठभूमीवर दूरदृष्टी ठेवून या कृषी विद्यापीठाने केलेले संशोधन आता कामी येत असल्याने प्रयत्न फळाला आल्याचे कापूस तज्ज्ञांचे मत आहे.

 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोलाcottonकापूसagricultureशेती