अकोला: यावर्षी आॅगष्ट महिन्यापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने यंदा रब्बीचे क्षेत्र यंदा घटण्याची शक्यता निर्माण झाली होती; परंतु सप्टेंबर व नंतर परतीच्या पावसाने काही भागात दमदार हजेरी लावल्याने रब्बी पिकांसाठी पोषक ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.कृषी विभागाने त्यादृष्टीने नियोजन केले असून, महाराष्टÑ राज्य बियाणे (महाबीज)महामंडळाने बियाणे उपलब्ध केले आहे. यावर्षी प्रकल्पातील साठ्यात काही प्रमाणात वाढ झाल्याने रब्बी हंगामासाठी पाणी मिळण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंतही वार्षिक सरासरी भरून काढणारा पाऊस पडला नव्हता. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तीव्र होण्याची भीती निर्माण झाली होती; परंतु सप्टेंबर महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडला तसेच परतीच्या पावसानेही बºयापैकी हजेरी लावल्याने यावर्षी सरासरी गाठली आहे. जिल्ह्यातील वाण व निर्गृणी प्रकल्प ओव्हर फ्लो झाला असून, अकोला जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७९१ मि.मी. पाऊस अपेक्षीत असताना १६ आॅक्टोबरपर्यंत या जिल्ह्यात ८१५.९६ मि.मी. अर्थात २५ मि.मी. अधिक पाऊस पडला.त्यामुळे रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांनीदेखील मूग,उडीद काढलेल्या क्षेत्रावर हरभरा व जेथे सिंचनाची सोय आहे तेथील शेतकºयांनी गहू पिकाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात हरभरा पिक पेरणी मोठ्याप्रमाणावर होत असते तथापि मागील काही वर्षापासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे हे पीक शेतकºयांना घेता आले नव्हते. यावर्षी थोडीफार पोषक स्थिती निर्माण झाली आहे.त्यादृष्टीने कृषी विभाग व शेतकºयांनी नियोजन केले आहे. जिल्ह्यात यावर्षी रब्बी ज्वारीचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. खारपाणपट्ट्यात ज्वारीची पेरणी करण्यात येणार आहे.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेदरम्यान, महाबीजने अमरावती विभागासाठी ७८ हजार क्ंिवटल हरभरा, गहू २५ हजार क्ंिवटल बियाण्यांचे नियोजन केले आहे.राजविजय २०२,२०३ सह फुले, विक्रमा आदी हरभºयांच्या बियाण्यांवर अनुदान दिले जाणार आहे. शेतकºयांना हवे असलेल्या बियाण्यावंरही अनुदान दिले जाणार असल्याचे वृत्त आहे.