आधीच शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामध्ये कोरोना काळातही शेतीची कामे सुरू आहे. जून महिन्यात सुरुवातीला झालेल्या पावसामुळे ५ शेतकऱ्यांनी आर्थिक गणित जुळवीत पेरणी केली. मात्र, अचानक पावसाने दडी मारल्याने पेरलेल्या दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती निर्माण झाली. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे आगमन झाले. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले व परिसरात रखडलेल्या पेरणीला सुरुवात झाली. या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. या वर्षी परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशी, मूग पिकाला पसंती दिली आहे.
रोहनखेड शेतशिवारात अपेक्षित पाऊस झाला नाही, परंतु मुगाच्या पेरणीला व उशीर होत असल्यामुळे नाईलाजाने पेरणी करावी लागत आहे. सध्या परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
- रमेश मोतीराम झामरे, शेतकरी, रोहनखेड