- संजय खांडेकरअकोला : तूर आणि हरभऱ्याचे भाव सातत्याने वधारत असल्याने सोयाबीनलादेखील चांगले भाव येणार असल्याचे बोलले जात आहे. भाववाढीचे चित्र लक्षात घेता देशभरात सोयाबीनची साठेबाजी वाढली आहे. ३८०० रु. प्रतिक्विंटल असलेला सोयाबीन काही महिन्यांत पाच हजारांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकंदरीत बाजारपेठेतील स्थिती पाहता, ‘एनसीडीईएक्स’नेदेखील देशभरातील गोदामामध्ये ९५ हजार क्विंटल सोयाबीनचा साठा साठविला आहे. यामध्ये सर्वात जास्त म्हणजे ३२ हजार क्विंटल साठा अकोल्यात आहे.विदर्भातील जवस, कापूस, ज्वारीच्या परंपरागत पिकांची जागा सोयाबीनने घेतली आहे. त्यामुळे विदर्भात तूर आणि हरभºयाच्या पिकांपेक्षा जास्त पेरा सोयाबीनचा वाढला आहे; मात्र जी गत तूर, हरभºयाची आहे, तीच गत सोयाबीनची आहे. शेतकºयाचे सोयाबीन ३५०० रु. प्रतिक्विंटलच्या वर विकला गेला नाही. आता मात्र सोयाबीनचे भावही तूर, हरभºयापाठोपाठ वधारत आहे. त्यामुळे सोयाबीनची साठेबाजी वाढली आहे. खासगी अडते आणि कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता एनसीडीईएक्सच्या गोदामामध्ये ९४,२६३ मेट्रिक टन सोयाबीनचा साठा ठेवलेला आहे. यामध्ये अकोल्यात सर्वाधिक साठा आहे.*असा आहे सोयाबीनचा साठाअकोला- ३२,१६३ क्विंटलकोटा -२७,२९४इंदूर - ११५४९मंदसूर -९८७८विदिशा-५८१४शुजालपूर -५६४७लातूर-९५०सागर-५१८नागपूर -४५२