अकोला : सोयाबीनला यावर्षी सोन्यासारखी चकाकी वाढली असून,सोयाबीनचे दर बाजारात प्रतिक्विंटल ४,१५० रुपयांवर पोहोचले आहेत. येत्या काही दिवसात विक्रमी म्हणजे ५ हजार रुपये क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता व्यापारी,अभ्यासकांनी वर्तविली आहे.राज्यात सोयाबीन पिकाने कापूस पिकाची जागा घेतली असून,४० हजार हेक्टरपर्यंत वाढले आहे. पंरतु हे पीक पावसावर अवलंबून आहे.यावर्षी सुरू वातीला कमी व पीक परिपक्वतेवर आले तेव्हा अती पाऊस असे विषम वातावरण तयार झाल्याने सोयाबीन उत्पादन व प्रतीवर परिणाम झाला आहे.तथापि यावर्षीची गरज बघता,सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे.गत पाच वर्षात २०१६-१७ हे वर्ष साडले तर यावर्षी सोयाबीनचे दर प्रतिक्ंिवटल ४,२०० रू पयांवर पोहोचले आहेत.आता होणारी आवक व मागणी बघता हे दर प्रतिक्ंिवटल पाच हजार रू पयांपर्यंत जाण्याची शक्यता शेतमाल विपणन अभ्यासक प्रल्हाद शेळके यांनी वर्तविली आहे.गत पाच वर्षाचे दर बघितल्यास २०१५-१६ मध्ये राज्यात सोयाबीनची सर्वाधिक असलेल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल २,८०० ते ४,१३५ रू पये होते.आवक पाच लाख ३५ हजार ९९० क्ंिवटल होती. २०१७-१७ ला आवक ८ लाख २६ हजार ४४५ क्ंिवटल होती दर कमीत कमी २,००० ते ४,२०० रू पये होते.त्यानंतरच्या दोन वर्षी हे दर कमी झाले. २०१७-१८ ला आवक ५ लाख २५ हजार ५५५ क्ंिवटल होती तर दर प्रतिक्ंिवटल १,९०० ते ३,८०० रू पयांपर्यंत होती.२०१८-१९ ला सोयाबीनची आवक ४ लाख ८२ हजार ७७८ क्विंटल होती तर दर प्रतिक्ंिवटल कमीत कमी २,४५० व जास्तीत जास्त ३,८५० रू पये होते.
सोयाबीनला सोन्याची चकाकी; दर पाच हजार रू पयांपर्यंत जाण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 6:26 PM