अकोला : सोयाबीनच्या दरात अद्याप सुधारणा झाली नसून, उलट या आठवड्यात दरात घट झाली आहे. वर्षाची परतफेड, लग्नसराई यासाठी शेतकºयांना पैशांची नितांत गरज आहे, त्यामुळे शेतकºयांनी सोयाबीन विक्रीला काढले आहे; पण राज्य कृषी मूल्य आयोग शेतकºयांना आताच सोयाबीन न विकण्याचा सल्ला देत आहे. या सर्व चक्रात शेतकरी मात्र पुरता फसला आहे.शासनाने यावर्षी २,६७५ रुपये प्रतिक्ंिवटल दर जाहीर केले आहेत; पण हंगाम सुरू होताच सोयाबीनचे दर कोसळले आहेत. सोयाबीन काढणीचा हंगाम आता संपला आहे; पण दर वाढतील, या आशेवर काही शेतकºयांनी सोयाबीन साठवून ठेवले होते. आता पैशांची गरज निर्माण झाल्याने शेतकºयांनी सोयाबीन विक्रीला काढले असून, अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज ३,१७३ क्ंिवटल सोयाबीनची आवक सुरू आहे. मागील आठवड्यात ही आवक सरासरी पाच हजार क्ंिवटल होती. जिल्ह्यात ही आवक मोठी आहे.बाजारात सध्या सोयाबीनचे सरासरी दर हे २,४८० रुपये असले, तरी सोयाबीनची प्रतवारी या नावाखाली शेतकºयांची लूट सुरू आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे यावर्षी सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटले असून, एकरी दोन ते अडीच क्ंिवटलचा उतारा लागला आहे; पण प्रतवारीचे निकष लावून शेतकºयांना काढणी हंगामाच्या सुरुवातीला १,७०० रुपये ते १,९०० रुपये प्रतिक्ंिवटल दर होते त्यामध्ये मध्यतंरी अल्पशी सुधारणा झाली होती; पण पुन्हा या आठवड्यात घट झाली असून, चांगल्या दर्जेदार सोयाबीनचे २,७९० रुपये प्रतिक्ंिंवटल वाढलेले दर शुक्रवारी २,६६० रुपयांवर आले, तर सरासरी दर २,४८० रुपये होते. हे दर हमीदरापेक्षा कमी आहेत.
अल्पभूधारक शेतकºयांनी सुरुवातीलाच सोयाबीनची विक्री केली. त्यातील काही अल्पभूधारक व इतर शेतकºयांनी सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत घरी ठेवले होते; पण दर वाढण्याचे चिन्हे तर नाहीत, उलट कमी होत असल्याने शेतकºयांनी सोयाबीन विक्रीला काढले आहे. शासनाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे. -अविनाश नाकट,जिल्हाध्यक्ष युवा शेतकरी संघटना,अकोला.