शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

सोयाबीनच्या दरांत आठ दिवसांत २३०० रुपयांची घसरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:21 AM

मागील खरिपात शेवटच्या काळामध्ये सोयाबीनच्या दरात चांगलीच वाढ पाहावयास मिळाली होती. दर दहा हजारांच्या पुढे गेले होते. या कारणामुळे ...

मागील खरिपात शेवटच्या काळामध्ये सोयाबीनच्या दरात चांगलीच वाढ पाहावयास मिळाली होती. दर दहा हजारांच्या पुढे गेले होते. या कारणामुळे यंदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परिणामी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली आहे. यंदा सुरुवातीला पावसाने साथ दिल्याने पीकही जोमात आले. त्यातच मुहूर्ताला ११ हजार ५०१ रुपयांपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे, मात्र दोन दिवस होत नाही तोच दरांत घसरण सुरू झाली. गत ८ दिवसांमध्ये २३०० रुपयांनी दर घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढली आहे.

आवकही कमी, भाव पडले!

ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीला कमी कालावधीत येणारे वाण पेरले आहे. त्यांची काढणी आता सुरू आहे. शेतकरी बाजारात सोयाबीन घेऊन येत आहेत. आवक कमी प्रमाणात असलीतरी भावामध्ये मात्र घसरण सुरू झाली आहे. नवीन सोयाबीन बाजारात आले, त्यावेळेस जवळपास ८ हजार ७०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता. मात्र, हळूहळू हा दर घसरत ५५०० पर्यंत आला आहे.

काढणीचा खर्च वाढला!

सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू झाला आहे; परंतु यंदा काढणी खर्च वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. गतवर्षी सोयाबीन काढणीचा खर्च हा एकरी २ हजारांपासून अडीच हजारांपर्यंत येत होता. यावर्षी हा खर्च ३ हजारांपर्यंत येत आहे. शेतकरी वर्गाने हा वाढवून येणाऱ्या खर्चासाठीही तजवीज केली. मात्र, बाजारात मालाचे भाव पडले आहेत.

असे घसरले दर

१५ सप्टेंबर ७८००

१६ सप्टेंबर ७०००

१७ सप्टेंबर ७५००

१८ सप्टेंबर ७०००

२० सप्टेंबर ७२००

२१ सप्टेंबर ६५००

२२ सप्टेंबर ५५००

आर्द्रतेचे प्रमाण अधिक

बाजारात आता आवक सुरू झाली आहे. त्याचवेळी भाव पडतायत. काही दिवसांनंतर आवक वाढणार आहे. त्यावेळी काय दर राहतील, अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे. सध्या येणाऱ्या नवीन सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.