सचिन राऊत अकोला, दि. १२- औषधी दुकानदार, सोनोग्राफी सेंटर व सीटी स्कॅन सेंटर आदिसारख्या वैद्यकीय आस्थापनांमध्ये रद्द करण्यात आलेल्या एक हजार आणि ५00 रुपयांच्या नोटा घेण्यात येत नसल्याने वैद्यकिय अडचणीला सामोर्या जाणार्या शेतकर्यांनी सुट्या पैशासाठी ४00 ते ५00 रुपये कमी दराने सोयाबीनची विक्री केल्याचे वास्तव समोर आले आहे. केंद्र शासनाने ८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून रद्द केलेल्या एक हजार आणि ५00 रुपयांच्या नोटा १४ नोव्हेंबरपर्यंत वैद्यकीय क्षेत्र, एसटी, रेल्वे, पेट्रोल पंपांना स्वीकारण्याची मुदत वाढवून दिली आहे; मात्र यामधील प्रत्येक क्षेत्रात चलाखी करून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्यात येत नसल्याचे वास्तव आहे. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांमध्ये शहरातील काही पॅथॉलॉजी लॅब, औषधी दुकान, सोनोग्राफी सेंटर, एक्सरे व सीटी स्कॅन सेंटरवरील रुग्णांकडून माहिती घेतली असता, या ठिकाणांवर रद्द झालेल्या नोटा स्वीकारुन उपचार होत नसल्याचे समोर आले. मोठय़ा हॉस्पिटलमध्ये एक हजार आणि ५00 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येत आहेत; मात्र विविध चाचण्या करण्यासाठी शंभर रुपयाची नोटच बंधनकारक आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकर्यांना वैद्यकिय उपचारासाठी नाडल्या जात आहे. एकीकडे त्यांना या नोटा उपलब्ध होत नाहीत आणि दुसरीकडे उपचारही गरजेचा असल्याने शेतकर्यांनी २ हजार ८00 रुपये प्रति क्विंटलचा भाव असलेले सोयाबीन २ हजार २00 ते २ हजार ३00 रुपये क्विंटल या भावाने विक्री केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटात असलेल्या शेतकर्यांना बंद नोटांच्या या काळात उपचारासाठी पिवळे सोने मातीमोल भावाने विक्री करावे लागत असल्याची माहिती ह्यलोकमतह्णने केलेल्या पाहणीत समोर आली आहे. १00 च्या नोटांची अशीही वास्तविकता..डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना केंद्र शासनाचे एक हजार आणि ५00 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत; मात्र रुग्णांना वेठीस धरून त्यांच्याकडून या नोटा न स्वीकारता १00 च्या नोटांचीच मागणी केली जात आहे. या बड्या व्यक्तींच्या घरात एक हजार आणि ५00 रुपयांच्या नोटांची मोठी साठवणूक आहे. या नोटा ह्यव्हाइटह्ण करण्यासाठी रुग्णांना १00 च्या नोटेची सक्ती करून घरातील मोठय़ा नोटा रुग्णांकडून स्वीकारल्याचे दाखवून त्या बँकेत जमा करण्यात येत असल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मिळालीरोगापेक्षा उपचार भयंकरमूर्तिजापूर तालुक्यातील शंकर भिंगारे, अकोल्यातील मनोहर क ाळे या शेतकर्यांनी त्यांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पिवळय़ा सोन्याची १00 रुपयांच्या नोटांसाठी क्विंटल मागे ४00 ते ५00 रुपये कमी दर मिळाल्यावरही विक्री केली. रोगापेक्षा उपचार भयंकर अशीच प्रतिक्रिया या शेतकर्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. नाव छापले तर उपचार मिळण्यास आणखी अडचण होईल, अशी धास्ती त्यांनी बोलून दाखविली; मात्र आता एवढय़ा संकटांचा सामना करीतच आहोत, तर कुठून तरी न्याय मिळेल म्हणून नाव छापाच अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.ग्रामीण भागात दलाल सक्रियशेतकर्यांनी कामापुरते सोयाबीन विक्री करून आपला उदरनिर्वाह भागविण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारासाठी किंवा शिक्षण अशा कामांसाठी सोयाबीन विक्री केल्याशिवाय पर्याय नाही, बाजार समित्यांमध्ये ५00 आणि एक हजार रुपयांच्या नोटा देऊनच सोयाबीनची खरेदी करण्यात येते, तर अन्य ठिकाणी या नोटा घेण्यात येत नाहीत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या संकटांच्या कैचीत सापडलेल्या शेतकर्यांना लुटण्यासाठी काही दलालही ग्रामीण भागात सक्रिय आहेत. या दलालांनी १00 च्या नोटा देऊन सोयाबीन खरेदी करण्याचा सपाटा लावला; मात्र त्यांनीही शेतकर्यांचा गळा घोटत क्विंटल मागे तब्बल ४00 ते ५00 रुपये दर कमी देऊन शेतकर्यांची पिळवणूक सुरू केल्याचे वास्तव आहे.
शंभरच्या नोटांसाठी कमी दराने सोयाबीनची विक्री !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2016 2:04 AM