अकोला : यावर्षी राज्यात ७५ हजार ते १ लाख क्विंटलपर्यत सोयाबीन बियाण्यांचा तुुटवडा भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत असूून,शेतकऱ्यांनी घरचे चांगले बियाणे वापरात आणावे असे तज्ज्ञांचे म्हणने आहे. राज्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले असूून, ३६ ते ४० लाख हेक्टरवर शेतकरी खरीप हंगामात सोयाबीनची परेणी करीत असतात. यासाठी जवळपास ८ ते ९ लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे.परंतु गतवर्षी सुुरू वातीला कमी पाऊस असल्याने सोयाबीन पेरणी लांबली होती.पेरणी केल्यानंतर पीक वाढीच्या अवस्थेत सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीनवर परिणाम होवूून उत्पादन घटले आणि प्रतही खराब झाली. त्यामुळे यावर्षी सोयाबीन बियाण्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंंडळाने ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले आहे. सद्या बियाण्यांवर प्रक्रिया सुुरू आहे. असे असले तरी बियाण्यांची गरज भासणार आहे. खासगी बियाणे कंपन्या हे बियाणे किती उपलब्ध करतात हेही बघावे लागणार आहे. असे असले तरी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने इतर राज्यात बिजोत्पादन घेतले आहे. त्यामुळे उर्वरित बियाणे उपलब्ध होईल असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आणि कृषी आयुक्तायाच्या वरिष्ठ अधिकाºयांची याबाबत बैठक झालेली आहे.पंरतु कोरोना विषाणूचा संंसर्ग टाळण्यासाठी देशात २३ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशात ‘लॉकडाऊन’ आहे. सर्वच प्रकारची वाहतूक बंंद आहे. त्यांचा परिणाम सुरू वातीला झाला.मजूर मिळत नसल्याने बियाणे प्रक्र्रिया होण्यास विलंब होत आहे. लॉकडाऊन कालावधी संपल्यांनतर काम वेगाने सुुरू होईल.तथापि वेळ लागणारच आहे. म्हणूनच शेतकºयांनी त्यांच्याकडे असलेले बियाणे जपूूण ठेवण्याची गरज आहे. असे आवाहन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी केले आहे.
डॉ.पंदेकृविकडे २,२०० क्विंटल बियाणे!
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने गतवर्षी सोयाबीनची लवकर पेरणी केली होेती. त्यामुळे पीकही लवकर काढण्यात आल्याने कृषी विद्यापीठाकडे २,२०० क्ंिवटल सोयाबीन बियाणे असून, ते शेतकºयांना उपलब्ध करू न देण्यात येणार असल्याची माहिती डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुुलगुुरू डॉ. विलास भाले यांनी दिली.