महाबीज व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलवर फेकले सोयाबीन बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 10:25 AM2020-07-10T10:25:51+5:302020-07-10T10:26:00+5:30

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलावर सोयाबीनचे बियाणे फेकले.

Soybean seeds thrown on the table of Mahabeej Managing Director | महाबीज व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलवर फेकले सोयाबीन बियाणे

महाबीज व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलवर फेकले सोयाबीन बियाणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने महाबीजचे बियाणे शेतात पेरले; मात्र महाबीजचे बियाणे बोगस निघाल्याने ते उगवले नाही. यात शेतकऱ्यांचा केवळ बियाणेच नाहीत, तर पेरणीचा संपूर्ण खर्च वाया गेला. शिवाय खरीप हंगामाचाही कालावधी संपण्यावर असताना महाबीजकडून बियाणे देण्याचे आश्वासन दिले जाते; मात्र आता बियाणे नाही, शेतकºयांना संपूर्ण नुकसान भरपाईपोटी एकरी उत्पादन खर्च द्या, अशी मागणी करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलावर सोयाबीनचे बियाणे फेकले.
यंदाच्या खरीप हंगामात पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या हजारो तक्रारी राज्यभरातून येत आहेत; खरीप हंगामाचा कालावधी संपण्यावर असताना दुबार पेरणीसाठीही शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शेतकºयांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अकोल्यात युवक काँग्रेसतर्फे गुरुवारी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांच्या कार्यालयात आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्यभरातून आलेल्या तक्रारी आणि त्यावर महाबीजने केलेल्या कारवाईचा जाब विचारला. शिवाय ज्या शेतकºयांचे बियाणे उगवले नाहीत, त्यांना बियाणे नाही तर संपूर्ण नुकसान भरपाईपोटी एकरी उत्पादन खर्च देण्याची मागणी केली. दरम्यान, महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून लेख आश्वासन मिळत नसल्याने संतपालेल्या आंदोलनकर्त्यांनी व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांच्या टेबलावर सोयाबीनचे बियाणे फेकत, आम्हाला बियाणे नको, तर संपूर्ण नुकसान भरपाईपोटी एकरी उत्पादन खर्च द्या, अशी मागणी करण्यात आली. युवक काँग्रेसतर्फे पुकारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये अकोल्यासह बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकºयांची उपस्थिती होती.


आंदोलनकर्त्यांनी फाडले महाबीजचे लेखी आश्वासन
बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर महाबीजकडून शेतकºयांना बियाण्यांचा पुरवठा करणे सुरू आहे.
ज्या शेतकºयांना बियाणे नको, अशांना बियाण्यांची रक्कम देण्याचे महाबीजचे धोरण असल्याचे लेखी आश्वासन महाबीजने आंदोलनकर्त्यांना दिले; मात्र हे लेखी आश्वासन फाडून आंदोलनकर्त्यांनी निदर्शने दिली.

 

Web Title: Soybean seeds thrown on the table of Mahabeej Managing Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.