पातूर : तालुक्यात सुरुवातीला दमदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. तालुक्यात ९० टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली असून, शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिल्याचे चित्र आहे. यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात दोन हजार हेक्टरने वाढ झाली आहे, तर कपाशीचा पेरा घटला आहे.
गतवर्षी २६ हजार ३३७ हेक्टर, तर या वर्षी २८ हजार १८९ एवढ्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. दरम्यान, गतवर्षी सहा हजार १६८ वरून पाच हजार २९३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.
यंदा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २२ तारखेला अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे कमालीचे नुकसान झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जूनच्या प्रारंभी जोरदार आलेल्या पावसामुळे पीक पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांना सुमारे सहा आठवडे पावसाची प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे प्रारंभीच्या पिकांची उत्पादनक्षमता घटली. त्यानंतर २२ जुलैला आलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे कमालीचे नुकसान झाले आहे. परिणामी, या वर्षीचा खरीप हंगाम धोक्यात आल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील नांदखेड, खामखेड, आगीखेड, खानापूर आदी गावांचा पीक पाहणी दौरा झाला आहे. सोयाबीन पिकासोबत इतर पिकांचेही कमालीचे नुकसान झाले असल्याचे आढळून आले आहे. पातूर तालुक्यातील नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात नुकसानी संदर्भातील अहवाल शासनाच्या पटलावर ठेवला जाण्याची शक्यता आहे.
अशी झाली खरीप हंगामात पेरणी
तालुक्यात ४२ हजार ५०८ क्षेत्रावर विविध प्रकारची पेरणी केली जाते. शेतकरी विविध पिके घेतात. त्यात प्रामुख्याने तूर ४५९३, उडीद १२७४, मूग १२९४ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.
पंचनाम्याची प्रक्रिया युद्धपातळीवर
तालुक्यात ९० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गतवर्षी ५३२ मिलिमीटर पाऊस होता. या वर्षी आजपर्यंत तीनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये अद्यापही २३२ मिलिमीटर पाऊस सध्याच्या घडीला पडला आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यात खरीप पिकाचे कमालीचे नुकसान झाले. त्या संदर्भातील पंचनामे करण्याची प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
कपाशीवर वाढता उत्पादन खर्च आणि सोयाबीनचा लागणारा कमी खर्च यामुळे तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे.
- डी. एस. शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर
120821\img-20210806-wa0303.jpg
सोयाबीन चार पेरा वाढला