मल्लिकार्जुन अप्पा धाडकर, सिद्धेश्वर धाडकर, नागेश निंबोकार, विजय पागधुनेसह अनेकांच्या शेतातील सोयाबीनला फूल शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणार नसल्याचे चित्र दिसत आहे. आधीच उशिरा पेरणी, बियाण्याचा तुटवडा, अतिवृष्टीसह अनेक संकटांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना केवळ सर्व्हेशिवाय कुठलाही मदतीचा हात मिळालेला नाही. काहींची तर विमा कंपनीकडून दीड महिना उलटूनही पाहणी नाही. त्यामुळे विमासुद्धा भेटणार की नाही याबद्दल शंका आहे. आधीच गेल्या दोन वर्षांपासून शेती तोट्याची ठरत आहे अन् बियाणे कंपनी, कृषी विभाग, विमा कंपनी केवळ चालढकल करीत आहे.
फोटो:
मी सोयाबीन पेरणी केली. मात्र, त्या सोयाबीनला फुले, शेंगा लागल्याच नाहीत. कृषी विभागाने पाहणी करून संबंधित कंपनीवर कारवाई करावी.
-मल्लिकार्जुन आप्पा धाडकर, शेतकरी व्याळा