अकोला : विदर्भात बहुतांश भागात मान्सून पोहोचला असून, पूर्ण विदर्भ व्यापण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात शनिवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत ३.० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. रविवार १४ जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. शनिवारी रात्री जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या.अकोला जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत ३५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या नैर्ऋ त्य मोसमी पाऊस मध्य महाराष्टÑाच्या आणखी काही भागात पोहोचला आहे. मराठवाडा व विदर्भाच्या बहुतांश भागातही प्रवेश केला आहे. गत २४ तासात शनिवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात काही भागात मुसळधार पाऊस पडला. १५ ते १७ जूनपर्यंत विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.३ मिमी पाऊस!१३ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुक्यात १.६ मिमी, बार्शीटाकळी तालुक्यात १. ५ मिमी, तेल्हारा तालुक्यात ११.५ मिमी, बाळापूर तालुक्यात ४.० मिमी, पातूर तालुक्यात ०.५ मिमी व मूर्तिजापूर तालुक्यात १.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
जिल्ह्यात तुरळक पाऊस; आज मुसळधार पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 10:56 AM