अकोला /मूर्तिजापूर : मध्य रेल्वे मंडळाच्या भुसावळ विभागातील लोहमार्गाचे तांत्रिक कार्य आणि भुसावळ -भाद्ली सेक्शन दरम्यान तिसरी रेल्वे लाइन जोडण्याचे काम आणि सोबतच नॉन इंटर लॉकिंगचे कार्य सुरू असल्याने या मार्गावरील ट्रॅफिक ब्लॉक करण्यात येत आहे. त्यामुळे २४ एप्रिल १९ पर्यंत अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.या २३ दिवसांच्या विशेष ब्लॉक दरम्यान खालील गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. गाडी क्रमांक ५११५४ अप आणि ५११५३ डाउन भुसावळ मुंबई पॅसेंजर गाडी १ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ५११८२ अप आणि ५११८१ डाउन भुसावळ देवलाली पॅसेंजर गाडी १ एप्रिल ते २३ पर्यंत रद्द करण्यात आली आहे . गाडी क्रमांक ५१२८६ अप आणि ५१२८५ डाउन भुसावळ नागपूर पॅसेंजर १ एप्रिल ते २४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ५९०७८ अप आणि ५९०७७ डाउन भुसावळ सूरत पॅसेंजर गाडी १ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत भुसावळ ते धरणगावपर्यंत रद्द करण्यात आली. ही गाडी अप-डाउन धरणगाव ते सूरत दरम्यान चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ५९०७६ अप आणि ५९०७५ डाउन भुसावळ सूरत पॅसेंजर १ एप्रिल ते २३ एप्रिलपर्र्यंत भुसावळ ते पालधीपर्यंत रद्द करण्यात आलेली ही गाडी अप-डाउन पालधी ते सूरतपर्यंत चालवण्यात येणार आहे. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी प्रवाशांना या दरम्यान त्रास होणार आहे, त्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.