प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची काढणार सोडतब्रम्ही खुर्द : मूर्तिजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपत आला आहे. त्या ग्रामपंचायतींमध्ये प्रारूप प्रभाग रचनेनुसार आरक्षणाची सोडत काढण्यासाठी २२ जून रोजी विशेष ग्रामसभा आयोजित केल्या आहेत. येत्या काळात होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून थेट सरपंचाची निवड करण्यासाठी निवडणूक होणार आहे, त्यामुळे या विशेष ग्रामसभेला महत्त्व आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, प्रभाग रचनेसाठी आरक्षणाची सोडत २२ जून रोजी सकाळी १0 वाजता एकाच वेळी काढण्यात येईल. याकरिता तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी राहुल तायडे यांनी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींमधील विशेष ग्रामसभांसाठी अध्यासी अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. तलाठी व संबंधित गावांचे ग्रामसेवक यांच्या मदतीने सर्व सदस्यपदाचे आरक्षण निश्चित होणार आहे. (वार्ताहर)या आहेत ५१ ग्रामपंचायती वीरवाडा, दातवी, शेलूनजीक, जांभा बु., समशेरपूर, सोनोरी (मूर्ती), कोळसरा, सांजापूर (हिरपूर), पोही, रामटेक, मंदुरा, बोरगाव (गवई निघोंट), दहातोंडा, आरखेड, बिडगाव, मुंगशी, दताळा, रेपाडखेड, येंडली, ब्रम्ही खुर्द, माना, नवसाळ, खोडद, वडगाव, राजापूर ( खि), वाई (माना), नागोली, खरब (नवले), मुरंबा, उमरी, सांगवा (मेळ), दापुरा, बोर्टा, लोणसना, मधापुरी, अकोली जहा., रंभापूर, जितापूर( खेड.), सोनाळा, शिवण खुर्द, मोझर, कानडी, धोत्रा, शिंदे, धानोरा वैद्य, जांभा खुर्द, सालतवाडा, खापरवाडा, हिवरा कोरडे, राजुरा सरोदे, शेरवाडी, भगोरा.
मुर्तीजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींमध्ये उद्या विशेष आमसभा
By admin | Published: June 21, 2017 6:14 PM