शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

क्रिकेट सट्टय़ांवर विशेष पथकाचा छापा

By admin | Published: June 19, 2017 4:54 AM

तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल ताब्यात; तीन मोठे सट्टा माफिया जाळय़ात.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यू तापडिया नगरातील पवन वाटिका येथे मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या सट्टा बाजारावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला. या ठिकाणावरून तीन सट्टा माफियांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कल्पेश अग्रवाल, ललित सुरेखा आणि श्याम हेडा अशी आरोपींची नावे आहेत. तर दुसर्‍या छाप्यात ताजमोहम्मद रेगीवाले या बुकीस ताब्यात घेतले.भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला गेल्या.या हायहोल्टेज सामन्यात जिल्हय़ात कोट्टय़वधी रुपयांचा सट्टा लावण्यात आला असून, न्यू तापडिया नगरमध्ये सट्टय़ाचा हा बाजार मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी या परिसरात दुपारपासूनच पाळत ठेवून सामना सुरू झाल्यानंतर दीड तासातच सट्टा बाजार चालविणार्‍यांवर कारवाई केली. पवन वाटिका येथून अकोल्यातील बडे सट्टा माफिया कल्पेश स्वरूपचंद अग्रवाल (३४) रा. गुलजारपुरा, ललित देवीदास सुरेखा (५५) रा. जुना भाजी बाजार जैन मंदिराजवळ आणि श्यामकुमार नरेशकुमार हेडा (४८) रा. बोरगाव खुर्द या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून १५ मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप दुचाकीसह तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे आहेत बडे सट्टा माफिया कल्पेश अग्रवाल, ललित सुरेखा, श्यामकुमार हेडा या तीन बड्या सट्टा माफियांना अटक करण्यात आली. यापूर्वी खदान पोलिसांनी मोहित शर्मा, संतोष मनवानी, महेश अमरनानी, विक्की गोस्वामी आणि अविनाश राजेश मेंगे या चार सट्टा माफियांना अटक केली होती. या सात सट्टा माफियांचे बडे माफिया अद्यापही मोकाट असून, पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकण्याची गरज आहे.दीड वर्षानंतर मोठी कारवाईजिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने न्यू तापडिया नगरात भारत-पाक सामन्यावर सुरू असलेल्या सट्टय़ावर छापा टाकला. अकोट येथे दीड वर्षापूर्वी मोठय़ा सट्टय़ावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता दीड वर्षानंतर विशेष पथकाने बड्या सट्टा माफियांवर कारवाई केली आहे.पोलीस अधिकारी मूग गिळून!विशेष पथकाने सट्टा माफियांवर कारवाई केली. त्यापूर्वी खदान पोलिसांनी सिंधी कॅम्पमध्ये एका मोठय़ा सट्टा बाजारावर कारवाई केली. या दोन कारवाई वगळता सट्टा माफियांकडून मोठा हप्ता घेत त्यांना पोलीस अधिकार्‍यांनी खुली सूट दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारत-पाक सामन्यावर रविवारी खुलेआम सट्टा खेळण्यात येत असताना पोलिसांना हा सट्टय़ाचा बाजार दिसला नाही का, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.

न्यू तापडिया नगरमध्ये मोठय़ा प्रमाणात सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली. यावर पाळत ठेवून सट्टा माफियांवर कारवाई करण्यात आली असून, तीन मोठय़ा सट्टा माफियांना अटक करण्यात आली आहे. या तिघांकडून तब्बल १५ च्यावर मोबाइल जप्त करण्यात आले असून, तपासात आणखी काही सट्टा माफियांची नावे समोर येत आहेत. मोठय़ा सट्टा माफियांची नावे समोर येणार असून, त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.- हर्षराज अळसपुरे,प्रमुख विशेष पथक, अकोला.