अकोला : बार्शीटाकली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघजळी, राजनदा आणि चिंचोली या तीन गावातील शेतात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू हातभट्टी वर पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांनी पथकासह रविवारी दुपारी छापेमारी केली. या तीन गावातील दारू अड्डे उध्वस्त करण्यात आले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.बार्शीटाकळी पोलिसांच्या आशीर्वादाने या पोलिस स्टेशनच्या हद्दीतील राजंदा वाघजाडी आणि चिंचोली या तीन गावाच्या नदीपात्रात नदीपात्रात दारूच्या भट्ट्या सुरू असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर आणि पथकाने छापेमारी करून सदाशिव जाधव रा. वाघजाळी, नितीन पवार रा. वाघजाळी, उद्धव डाबेराव रा. चिंचोली, दुर्गासिंग राठोड रा. चिंचोली यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारू साठा आणि दारू बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.त्यानंतर सदाशिव जाधव आणि नितीन पवार रा वाघजाळी या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गावठी दारू साठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. उद्धव डाबेराव आणि दुर्गासिंग राठोड या दोघांकडून दारूसाठ आणि गावठी दारू बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आला आहे. बार्शीटकली पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम जुगार अड्डे, गावठी दारू बनविनारे अड्डे सुरू असताना याकडे बार्शीटकली पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने या अड्ड्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली. पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर यांनी क्षणाचाही विलंब न करता बार्शीटाकळी तालुक्यातील या तीनही गावातील गावठी दारू अड्ड्यावर छापेमारी करून तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर आणि पथकाने केली
विशेष पथकाच्या छापेमारीत दारू अड्डे उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 3:07 PM