अकोला - आकाटे तालुक्यातील बोर्डी येथील जयस्वाल नामक व्यक्तीच्या अवैधरीत्या दारु विक्रीच्या अड्डयावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी रविवारी मध्यरात्री छापा टाकला. या ठिकाणावरुन १० हजार रुपयांच्या दारुसाठयासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.बोर्डी येथील अरुण जयस्वाल, सतीष जयस्वाल व राजु जयस्वाल या तिघांच्या घरासमोरील जनावरांच्या गोठयातून हे तिघेही जन देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने रविवारी मध्यरात्री या गोठयात छापा टाकून तब्बल १० हजार रुपयांचा दारुसाठा व मुद्देमाल जप्त केला आहे. जयस्वाल बंधू या ठिकाणावरुन देशी व विदेशी दारुची मोठया प्रमाणात विक्री करीत असल्याचेही या छाप्यानंतर समोर आले. या तिघांवर आकोट पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे व त्यांच्या पथकाने केली.
बोर्डी येथील दारु अड्डयावर विशेष पथकाचा छापा; १० हजार रुपयांचा दारुसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:16 PM
अकोला - आकाटे तालुक्यातील बोर्डी येथील जयस्वाल नामक व्यक्तीच्या अवैधरीत्या दारु विक्रीच्या अड्डयावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी रविवारी मध्यरात्री छापा टाकला.
ठळक मुद्देया ठिकाणावरुन १० हजार रुपयांच्या दारुसाठयासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जयस्वाल बंधू या ठिकाणावरुन देशी व विदेशी दारुची मोठया प्रमाणात विक्री करीत असल्याचेही या छाप्यानंतर समोर आले.