अकोला : प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने सोमवार, १४ डिसेंबर पासून हावडा ते मुंबई दरम्यान विशेष रेल्वे गाडी दररोज चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकरांना आणखी एक गाडी मिळणार आहे.
गाडी क्रमांक ०२२६० अप हावडा ते मुंबई ही विशेष गाडी १४ डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दररोज प्रस्थान स्टेशन हुन दुपारी २ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई स्टेशन येथे रात्री ०९.२० वाजता पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर दुसर्या दिवशी सकाळी ११.३० वाजता येऊन ११.३५ वाजता मुंबईकडे रवाना होईल.
गाडी क्रमांक ०२२६० डाउन मुंबई ते हावडा ही विशेष गाडी १६ डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दररोज प्रस्थान स्टेशन हुन सकाळी ६.०० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता हावडा स्टेशन येथे पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर दुपारी २.४५ वाजता येऊन २.५०वाजता हावडाकडे रवाना होईल.
२ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान, २ द्वितीय आसन श्रेणी आणि एक पेंट्री कार अशी या विशेष गाडीची संरचना आहे.
पूर्णत आरक्षित असलेल्या या विशेष गाडीसाठी १२ डिसेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आरक्षण सेवासुरू होईल.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड १९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.