गाडी क्रमांक ०७६२३ अप ही गाडी हजूर साहिब नांदेड येथून १ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर गुरुवारी सकाळी ०६.५० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सायंकाळी ०७.२० वाजता श्री गंगानगरला पोहोचेल. ही गाडी दर गुरुवारी अकोला स्थानकावर येईल.
गाडी क्रमांक ०७६२४ डाऊन ही गाडी श्री गंगानगर येथून ३ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवारी दुपारी १२.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री ०२.३० वाजता हजूर साहिब नांदेडला पोहोचेल. ही गाडी दर रविवारी अकोला स्थानकावर येणार आहे.
या गाडीला अकोला, शेगाव, मलकापूर , भुसावळ, जळगाव, अमळनेर, नंदुरबार आदी ठिकाणी थांबा असणार आहे.
एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, नऊ शयनयान आणि दोन द्वितीय श्रेणी आसन, अशी या गाडीची संरचना आहे. केवळ कम्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना प्रवासादरम्यान कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.