एसडीओंना दिलेल्या निवेदनानुसार, फेब्रुवारी २०१७ मध्ये रस्ता विस्तारीकरणासाठी अतिक्रमण मोहीम राबवून अनेक घरे, दुकाने पाडली. रस्ता रुंदीकरण व नाली बांधकाम दोन्ही बाजूने अंजनगाव रोड- नाका खाई नदीच्या पुलापासून-शिवाजी चौकापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु एका बाजूने नाली बांधकाम केले, तर दुसऱ्या बाजूने केले नाही. त्यामुळे घरात पावसाचे पाणी साचत आहे. तसेच रस्त्यावर गटारी साचल्या आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एसडीओंच्या कार्यालयात धडक देत रस्त्याचे काम त्वरित करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. निवेदन देताना प्रशांत नाठे, अनिलकुमार पिलातकर, प्रमोद भगत, दिवाकर भगत, विजय गोरले, राहुल मानकर, महादेव भगत, रविंद्र भगत, अक्षय नागापूरे, सुमेध तेलगोटे, विकास तेलगोटे, गोलू तेलगोटे, अमोल नेमाडे, भूषण दुधे, महादेव भगत, रवींद्र भगत, अक्षय नागपुरे, शेखर नागपुरे, नितीन बोराडे, संतोष भावे, राजू भावे, दिनेश भगत, विजय भगत, सतीश गोमासे, प्रमोद बाभूळकर, गोपाल भावे, महादेव भास्कर, प्रवीण ताडे, हर्षल पायगन, प्रकाश ढगे, निलेश देविदास भावे, मोहन कातोरे, चेतन राऊत, मंगेश रतन माकडे, सुरेश थोरात, अंबादास रंधे, रामदास नाठे, संतोष शिंदे, दीपक कराडे, अनिल बोडखे, अनिल अस्वार, वैभव मुंडे, गोपाल माकोडे, श्रावण आहिर, राजेश रंधे आदी उपस्थित होते.
अंजनगाव रस्त्याचे काम त्वरित करा; नागरिकांची एसडीओ कार्यालयात धडक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:20 AM