अकोला – काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काेराेना चाचण्यांचा वेग् वाढविण्यात आला असून व्यापाऱ्यांकडूनही चाचण्यासाठी गर्दी केली जात आहे अकोला महानगरपालिका प्रशासनव्दारे रविवारी शहरातील एकुण 3223 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले अकोला शहरात होत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर जास्त प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी स्वॅब संकलन केंद्र सुरू केले असून त्यामध्ये आर.टी.पी.आर. चाचणीसाठी भरतीया रूग्णालय येथे 253 नागरिकांचे, कस्तूरबा गांधी रुग्णालय, डाबकी रोड येथे 100 नागरिकांचे, हरिहरपेठ नागरी आरोग्य केंद्र येथून 101 नागरिकांचे, मनपा शाळा क्रं. 16 सिंधी कॅम्प येथे 190 नागरिकांचे, मनपा आयुर्वेदिक दवाखाना, अशोक नगर येथे 59 नागरिकांचे, नांयगांव येथे 105 नागरिकांचे, कृषी नगर नागरी आरोग्य केंद्र येथे 202 नागरिकांचे, विठ्ठल मंदीर, विठ्ठल नगर, मोठी उमरी येथे 200 नागरिकांचे, सातव चौक येथे 160 नागरिकांचे, रत्लम लॉंस, राउत वाडी येथे 200 नागरिकांचे, चौधरी विद्यालय, रतनलाल प्लॉट येथे 235 नागरिकांचे, जी.एम.डी.मार्के, राम नगर (मसने हॉल) येथे 51 नागरिकांचे, हायवे वरील किराणा बाजार येथे 76 नागरिकांचे याचसोबत रॅपीड अॅन्टीजेन चाचणीसाठी कस्तूरबा गांधी रुग्णालय, डाबकी रोड येथे 125 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले त्यामधून 2 नागरिकांचे चाचणी अहवाल पॉझेटीव्ह आले आणि 123 नागरिकांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले, मनपा आयुर्वेदिक दवाखाना, अशोक नगर येथे 114 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले त्यामधून 114 नागरिकांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले, विठ्ठल मंदीर, विठ्ठल नगर, मोठी उमरी येथे 100 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले त्यामधून 12 नागरिकांचे चाचणी अहवाल पॉझेटीव्ह आले आणि 88 नागरिकांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले, सातव चौक जठार पेठ येथे 120 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले त्यामधून 3 नागरिकांचे चाचणी अहवाल पॉझेटीव्ह आले आणि 117 नागरिकांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले. रत्लम लॉंस येथे येथे 210 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले त्यामधून 10 नागरिकांचे चाचणी अहवाल पॉझेटीव्ह आले आणि 200 नागरिकांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले, चौघरी विद्यालय येथे 372 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले त्यामधून 27 नागरिकांचे चाचणी अहवाल पॉझेटीव्ह आले आणि 345नागरिकांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले, जी.एम.डी.मार्के, राम नगर (मसने हॉल) येथे 150नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले त्यामधून 5 नागरिकांचे चाचणी अहवाल पॉझेटीव्ह आले आणि 145 नागरिकांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले तसेच किराणा बाजार येथे 100 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले त्यामधून 4 नागरिकांचे चाचणी अहवाल पॉझेटीव्ह आले आणि 96 नागरिकांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले. तसेच दि. 6 मार्च रोजी एकुण 112 नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझेटीव्ह आलेले आहे. तसेच रॅपीड अॅन्टीजेन चाचणीच्या माध्यमातून आज दि. 7 मार्च रोजी एकुण 63 नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझेटीव्ह आले आहे
काेराना चाचण्यांचा वेग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:18 AM