- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला पोलीस दलातील वाहतूक विभागात दोन अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. या एका वाहनामध्ये फिक्स टेबल अटॅच वुईथ स्पीड गन मशीन, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह मशीन आणि जीपीआरएस कनेक्टिव्हिटीची व्यवस्था आहे. यामुळे बेदरकारपणे शिवाय मद्य प्राशन करून वाहन चालविणे चांगलेच महागात पडणार आहे. शहरात अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत असले तरी काही चालकांच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. यावर प्रतिबंध म्हणून आणि दोषी वाहनचालकांवर कारवाई व्हावी, म्हणून ही वाहने महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.या एका वाहनांमध्ये असलेली फिक्स टेबल अटॅच वुईथ स्पीड गन मशीन ही वेगाशी स्पर्धा करणाऱ्या वाहनचालकांना अचूक वेधून कारवाई करू शकतील.उल्लेखनीय म्हणजे, ५०० मीटरपर्यंतच्या वाहनचालकांवर कारवाई करणे शक्य होणार आहे, तसेच या वाहनातील ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह मशीन म्हणजे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी या मशीनचा उपयोग होणार आहे.त्याचबरोबर जीपीआरएस कनेक्टिव्हिटी असलेले संयंत्रही वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवणार आहे.पोलीस अधीक्षक अमोघ गावकर तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या प्रयत्नाने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्यात मोलाची मदत होणार आहे. संपूर्ण शहरात ही वाहने पेट्रोलिंग करणार असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे.
वाहतूक पोलिसांवरही वॉचया वाहनात जीपीआरएस कनेक्टिव्हिटीची व्यवस्था एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. वाहतूक पोलीस हे वाहन घेऊन गस्तीवर जातील तेव्हा ते कुठे आहेत आणि काय करीत आहेत, याची माहितीदेखील वाहतूक शाखेच्या कार्यालयाकडे असणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे वाहन अडगळीत उभे करून आराम करण्याचे दिवस आता संपले आहेत. पोलीस कर्मचाºयांनाही सतर्क असावे लागणार आहे. याशिवाय कुठेही वाहतूक कारवाई करावयाची असल्यास या वाहनातील पोलिसांशी संपर्क करून त्यांना तत्काळ घटनास्थळी पाठविण्याची व्यवस्था या सिस्टममध्ये आहे.
‘स्पीड गन कार’ची वैशिष्ट्येस्पीड गन कारमध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीड गन, ई-चलन, ब्रिथ अॅनालायझरचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात कारवाई करणे वाहतूक शाखेला सोपे होणार आहे. या वाहनात रस्त्यावर भरधाव वेगाने येणारी वाहने, चारचाकी वाहनात काळी फिल्म लावणाºयांवर स्पीड गन यंत्राच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. एखादे वाहन वेग मर्यादेचे उल्लंघन करून पळाल्यास ३०० मीटरपर्यंत लांब असलेल्या वाहनाचा क्रमांकसुद्धा टिपता येणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयाविरुद्ध कारवाईसाठी एक ब्रिथ अॅनालायझरही या कारमध्ये आहे. ही कार स्वयंचलित असून, नियमाचे उल्लंघन करणाºयांना थेट मोबाइलवर नोटीस पाठविली जाणार आहे. जिल्ह्यात दाखल झालेली स्पीड गन वाहनांपैकी एक जिल्हा वाहतूक शाखेतच राहणार आहे.