अकोला : शहरातील शिवणी ते महाबीज कार्यालय दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामाला गती मिळाली आहे. निम्मे काम पूर्ण झाले असून लवकरच रस्त्याचे काम पूर्णत्वास जाणार आहे.
वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष!
अकोला : सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रस्ते दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली आहे;मात्र या वृक्षरोपट्याच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. वन विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वृक्ष धोक्यात सापडले आहेत.
‘फीट इंडिया मूव्हमेंट’ योजना ठप्प
अकोला : केंद्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत ‘फीट इंडिया मूव्हमेंट’ योजनेंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याची ‘फिटनेस असेसमेंट टेस्ट’ घेतली जाते; मात्र कोरोना संसर्गामुळे ही योजना पूर्णत: ठप्प आहे.
शहरातील सिनेमागृहांची सफाई
अकोला : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सिनेमागृहे बंद आहेत. ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत ती सुरू केली जाणार असून शहरातील सिनेमागृहांची सफाई सध्या सुरू आहे.
मोकाट जनावरांचा वाहतुकीस अडथळा
अकोला : प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरे बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मोकाट जनावरांनी प्रमुख मार्गावर काही महिन्यांपासून हैदोस घातला आहे.
शासकीय कार्यालयात नियमांना खाे
अकोला : काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात असताना सुद्धा शासकीय कार्यालयांमध्ये याचा विसर पडलेला दिसून येत आहे. शासकीय कार्यालयात असलेल्या सॅनिटायझरच्या बाॅटल रिकाम्या व अडगळीच्या ठिकाणी पडलेल्या दिसून येत असून मास्कचा वापरही हाेताना दिसून येत नसल्याचे दिसून येत आहे.
ऑनलाइन व्यवहार जपून करा!
अकोला : ऑनलाइन व्यवहाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने, ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सायबर सेलतर्फे करण्यात आले आहे.