अकोला: गांधी रोड ते जनता भाजी बाजार या दरम्यान अंडरपास रस्त्याची निर्मिती केली जात आहे. लॉकडाऊन दरम्यान अंडरपास निर्मितीचे काम रखडले होते, मात्र गत काही दिवसांपासून या कामाला गती मिळाली आहे. दोन्ही बाजूनी जलद गतीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
पेट्रोलचा भडका, अकोलेकरांची सायकलला पसंती
अकोला: राज्यात पेट्रोलदरवाढीमुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे बहुतांश अकाेलेकरांकडून सायकलींना पसंती दर्शवित असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक जण महत्त्वाच्या कामासाठीच दुचाकीचा वापर करत आहेत. बाजारात जाण्यासाठी बहुतांश लोक दुचाकी ऐवजी सायकल नेताना दिसून येत आहेत.
बदलत्या वातावरणाचा आरोग्याला फटका
अकोला: जिल्ह्यातील दिवसा गर्मी, तर रात्री थंड वातावरण तयार होत आहे. त्याचा फटका आरोग्याला बसत असून दवाखाने हाऊसफुल्ल होत आहेत. मोठ्यांसह चिमुकल्यांमध्येही सर्दी, खोकला आणि तापीचे लक्षणे दिसून येत आहेत.
अकोलेकरांना सुपर स्पेशालिटीची प्रतीक्षा
अकोला: अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची इमारती तयार झाली असून, पहिल्या टप्प्यातील पदांनाही मंजुरी मिळाली आहे. मंजूर पदे भरण्याची प्रक्रिया अजूनही सुरू झाली नाही. त्यामुळे रुग्णालय सुरू होण्याची अकोलेकरांना प्रतीक्षा कायम आहे.
एटीएममध्ये ठणठणाट
अकोला: शनिवार, रविवार सुटीचा दिवस असल्याने अनेक जण बाजारहाट करतात, मात्र याच दिवशी शहरातील काही एटीएममध्ये ठणठणाट असल्याचे दिसून आले. कौलखेड, तुकाराम चौक परिसरातील काही एटीएममध्ये पैसेच उपलब्ध नसल्याने अनेकांची पंचाईत झाल्याचे दिसून आले